वक्फ कायद्याच्या निषेधार्थ ‘बत्ती गुल’ आंदोलनाला १००% प्रतिसाद

अमळनेर (प्रतिनिधी)  ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या ‘वक्फ बचाव अभियान’ अंतर्गत देशभरात पुकारलेल्या ‘बत्ती गुल’ आंदोलनाला अमळनेर शहरातून शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. हा निषेध शांततेत करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, नवीन वक्फ कायदा २०२५ च्या निषेधार्थ मुस्लिम समाजाने ३० एप्रिल रोजी रात्री ९.०० ते ९.१५ या दरम्यान आपल्या घर, दुकाने, मस्जिदे यांची वीज बंद ठेवून शांततेत निषेध व्यक्त केला.

अमळनेर शहरातील कसाली म्होल्ला, शाह आलम नगर, इस्लामपुरा, गांधलीपुरा, जापां नजिन, जोशिपुरा, मिलचाल, ईमान पुरा, उस्मानिया नगर, खाजा नगर आदी भागांत नागरिकांनी एकजुटीने या आंदोलनात सहभाग नोंदवला.

या आंदोलनातून मुस्लिम समाजाने वक्फ मालमत्तांवरील त्यांच्या अधिकारांचे संरक्षण करण्याची भावना ठामपणे मांडली आहे. संपूर्ण शहरात कुठलाही अनुचित प्रकार न घडता आंदोलन शांततेत पार पडले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *