अमळनेर जळगाव येथील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळवुन नेणाऱ्या ४७ वर्षीय इसमास येथील जिल्हा न्यायालयाने ३ वर्षांची शिक्षा सुनावली आहे
जळगाव येथील सुप्रीम कॉलनी शारदा नगर हायस्कूल जवळ राहणाऱ्या एका १५ वर्षीय तरुणीस आरोपी सुनील श्रीराम मोखेडे वय ४७ याने पीडित मुलगी दि २७ नोव्हेबर २०१४ रोजी कमळगाव ता चोपडा येथील यात्रेस गेली असता लग्नाचे आमिष दाखवून पळवून भुसावळ मार्गे नागपूर येथे नेले त्याठिकाणी अडीच हजार रुपये महिन्याची भाड्याची खोली घेवून वास्तव्य करू लागला तपासाधिकारी वाय ए देशमुख यांनी मोबाईल लोकेशन वरून आरोपीचा माग काढून त्याला नागपूर येथून अटक करण्यात आली पीडितांच्या वडिलांनी दि १ डिसेंबर २०१४ रोजी दिलेल्या फिर्यादीवरून अडावद ता चोपडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर खटल्यात एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले त्यात पीडित मुलगी,सुरेखा बेलसरे यांची साक्ष महत्वाची ठरवत अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश राजीव पांडे यांनी आरोपीस ३ वर्ष शिक्षा व ३ हजार रुपये दंड दंड न भरल्यास ६ महिने कैद तर दुसऱ्या आरोपात १ वर्ष कैद २ हजार रुपये दंड,दंड न भरल्यास ३ महिने कैद, तर तिसऱ्या आरोपात १ वर्ष कैद तर ३ हजार दंड दंड न भरल्यास ६ महिने कैद अशी शिक्षा सुनावली सदर दंडाच्या रकमेतून सुमारे सात हजार रुपये पीडित मुलीस देण्याचे आदेश न्यायालयाने दिले सरकार पक्षातर्फे सरकारी वकील किशोर आर बागुल यांनी युक्तिवाद केला.