अमळनेर (प्रतिनिधी) किरकोळ कारणावरून झालेल्या वादात दोघांना मारहाण केल्याची घटना
शहरातील गांधलीपुरा भागात घडली. याप्रकरणी दोन्ही गटाकडून एकमेकांविरुद्ध अमळनेर पोलिसात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, धीरज सुनील देवरे (रा.सिद्धार्थ चौक गांधलीपुरा, अमळनेर) हा १६ रोजी रात्री व्यायाम करून मोटरसायकलने घरी जात असतांना साहिलने आई वरून शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. तर बाजूला उभे असलेले त्याचे मित्र अल्तमश, आकीब, अदनान यांनी देखील लोखंडी रॉडने मारहाण करण्यास सुरुवात केली. आणि शिवीगाळ करू लागले. त्यांच्यावर अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद सोनवणे करीत आहेत. पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि.१६ रोजी नातेवाईकांचे लग्न आटोपून घरी जात असतांना धिरज देवरे याने कानाला हात लावून मोबाईल नंबर दे असा इशारा केला. ही बाब घरी सांगितल्यावर माझा लहान भाऊ साहिल शेख हारु हा त्याला समजविण्यासाठी घरी गेला असता त्याला धीरज देवरे याने चपटाबुक्क्यांनी मारहाण केली. तर रात्री १० वाजता धिरज देवरे, पंकज देवरे मामा पिंट्या, व सुनील देवरे हे आमच्या घरासमोर येऊन तुम्हाला येथे राहू देणार नाही, अशी धमकी देऊन गेल्याने त्यांच्यावर अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ करीत आहेत.