अमळनेर (प्रतिनिधी) येथील ढेकू रोडवरील क्रांती पर्व स्मारकाचा 25 रोजी सकाळी 10 वाजता आमदार अनिल पाटलांच्या हस्ते लोकार्पण सोहळा आयोजित कारण्यात आला आहे.
अमळनेर येथील नगरपरिषद अंतर्गत प्रभाग क्र. 7 मधील जय हिंद कॉलनी येथील खुल्या भूखंडाचा सर्वांगीण विकास अंतर्गत 77 लक्ष निधीतून निर्माण झालेल्या विकास कामाचे लोकार्पण होणार आहे. खासदार स्मिताताई वाघ यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. नगरपरिषदेने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. सदर भूखंड विकसित करताना याठिकाणी क्रांतिवीर उत्तमराव पाटील व क्रांती वीरांगना लीलाताई पाटील यांचे क्रांतीपर्व स्मारक साकारण्यात आले आहे. तरी समस्त नागरिक, महायुतीचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, माजी नगरसेवक यांनी या लोकोपयोगी विकासप्रकल्पाच्या सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.