🔷 चालू घडामोडी :- 24 एप्रिल 2025
◆ स्मृती मानधना विस्डेन क्रिकेट पुरस्कार दोनदा जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.
◆ निकोलस पूरन 2025 चा टी 20 क्रिकेट मधील अव्वल खेळाडू ठरला असून तो वेस्ट इंडिज देशाचा खेळाडू आहे.
◆ जसप्रीत बुमराह ने 2024 मध्ये सर्वाधिक 71 कसोटी विकेट घेतल्या आहेत.
◆ जसप्रीत बुमराह 20 पेक्षा कमी सरासरीने 200 विकेट घेणारा पहिला कसोटी गोलंदाज आहे.
◆ महाराष्ट्र राज्यात पर्यावरण वाचवा, वसुंधरा सजवा या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला आहे.
◆ कलैग्रर कैविनई तीट्टम योजना तामिळनाडू राज्याने लाँच केली आहे.
◆ बिहार मध्ये नितीश कुमार यांच्या हस्ते महिला संवाद अभियान सुरू करण्यात आले आहे.
◆ जागतिक पुस्तक दिन 23 एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो.
◆ तामिळनाडू राज्यात भारतातील पहिले प्रोटोटाईप फास्ट ब्रिडर रिएक्टर बनविण्यात येत आहे.
◆ वर्ल्ड प्रेस फोटो द्वारा पॅलेस्टाईन देशाच्या फोटोग्राफरला वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर अवॉर्ड देण्यात आला आहे.
◆ लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड्समध्ये सिमोन बायल्स आणि मोंडो डुप्लंटिस यांना स्पोर्ट्सवुमन आणि स्पोर्ट्समन ऑफ द इयर 2025 म्हणून गौरविण्यात आले.
◆ मोंडो डूप्लांटिस ला लॉरिअस वर्ल्ड स्पोर्ट्समन ऑफ द इयर अवॉर्ड 2025 देण्यात आला असून तो स्वीडन देशाशी संबंधित आहे.
◆ सर्बिया देशाच्या पंतप्रधानपदी ड्युरो मैंकुट यांची नियुक्ती झाली आहे.
◆ आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाचे मुख्यालय जिनिव्हा येथे आहे.
◆ भारताने आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाच्या डायरेक्टर पदासाठी भारताने एम रेवती चे उमदेवार म्हणून नाव दिले आहे.
◆ UNESCO ने 16 स्थळांचा ग्लोबल जिओपार्क नेटवर्क मध्ये समावेश केला आहे.
◆ गृह मंत्रालयाने HEALD (Healthy Liver Education and Alcohol-associated Liver Disease Prevention) अभियान सुरू केले आहे.
◆ लिमा येथे आयोजित ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताने एकूण 7 पदके जिंकली आहेत.
◆ लिमा येथे झालेल्या ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताने तिसरे स्थान पटकावले आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ माहिती संकलन :- खबरीलाल