अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यातील झाडी येथील सुनील सुभाष पाटील वय २४ याचा २२ रोजी निर्घृण खून करण्यात आला होता.
या बाबत मारवड पोलीस ठाण्यात २३ रोजी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता व घटनास्थळी फॉरेन्सिक तज्ञा सह श्वान पथक बोलविण्यात आले होते. व अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, पोलिस उपविभागीय अधिकारी स्वरूप अग्रवाल व रफिक शेख यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती त्याच वेळी मारेकरी हे कुटुंबातील असल्याचा संशय पोलिसांनी आल्याने पोलिसांनी मयताचे भाऊ ,काका, चुलतभाऊ यांना ताब्यात घेऊन चौकशी केली होती त्या नंतर चार गावातील मित्रांना ही चौकशीसाठी ताब्यात घेतले होते मात्र चौकशी करून सोडून देण्यात आले होते, खुनाचे रहस्य व गूढ वाढत गेले होते, काल ६ रोजी पोलिसांनी मयत सुनीलचा सख्खा भाऊ गणेश सुभाष पाटील वय २६ राहणार झाडी याला सकाळीच ताब्यात घेतले व पोलीस खाक्या दाखवताच आई व भावाने संगनमताने खून केल्याची कबुली जबाब दिल्यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील यांनी काल दुपारी त्यास अटक करून अमळनेर येथील न्यायालयात हजर केले असता न्यायमूर्ती वाय जी वळवी यांनी आरोपीस पाच दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी केली, तर सायंकाळी ४:३० वाजता पुन्हा याच कारणावरून मयत सुनीलची आई संगीताबाई सुभाष पाटील वय ४६ राहणार झाडी हिस मारवड पोलिसांनी अटक केली आहे