अमळनेर (प्रतिनिधी) स्व. पंढरीनाथ छगनशेठ भांडारकर कॉलेज ऑफ डी.फार्मसी आणि स्व. प्रा. आर. के. केले कॉलेज ऑफ बी. फार्मसी महाविद्यालयात जागतिक वसुंधरा दिनानिमित्त वसुंधरेचे संवर्धन व वृक्षारोपण कार्यक्रम झाला. यानिमित्ताने महाविद्यालयाच्या परिसरात औषधी गुणधर्मयुक्त व पर्यायाने मानवी स्वास्थ्य व आरोग्य संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण अशा आवळा, रुद्राक्ष, इन्सुलिन, लिंबु, कण्हेर व इतर विविध वृक्षांची लागवड करण्यात आली.
कार्यक्रमास महाविद्यालयातील प्रा.देवेश भावसार, प्रा.अनिल बोरसे, प्रा.रवींद्र माळी, प्रा. प्रितम पाटील, प्रा. सतिश ब्राम्हणे, प्रा. प्रफूल्ल चव्हाण, प्रा.स्वप्नाली महाजन, प्रा. सुनिता चोपडे, प्रा. वर्षा पाटील प्रा. छाया महाजन, प्रा. शिवानी शर्मा, प्रा. वैशाली कुलकर्णी, प्रा. गीतांजली पाटील, प्रा. प्रगती पाटील, प्रा. हर्षदा पवार, प्रा.मानसी उपासनी तसेच अनिल महाजन, कविता शिंपी, महेश सोनजे, ज्ञानेश्वर चौधरी, यश शिंपी, किशोर बुलके व कैलास कड यांनी महाविद्यालय परिसर सुशोभित केला.
पदवी, पदविका अभ्यासक्रमातील सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व सहभागी विद्यार्थ्यांचे खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष डाॅ.संदेश बी. गुजराथी, फार्मसी विभागाचे चेअरमन योगेश मुंदडे, खा. शि. मंडळाचे चिटणीस प्रा.पराग पी. पाटील, प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. बी. जैन, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डाॅ. रवींद्र सोनवणे यांनी कौतुक केले आहे.