जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल; ५० लाखासाठी केले होते अपहरण
प्रतिनिधी अमळनेर पार्थ बहुगुणे अपहरण प्रकरणात सहाही आरोपींना जन्मठेप शहरात खळबळ जिल्हा सत्र व अतिरिक्त न्यायालयाचे न्यायाधीश व्ही पी आव्हाड यांनी शिक्षा सुनावली आहे.,
शहरातील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. निखील बहुगुणे यांचा मुलगा पार्थ दि 3 जानेवारी 2017 रोजी सायंकाळी शिकवणीसाठी गेला असता रात्री ८.३० वाजेच्या सुमारास ग्लोबल स्कुल जवळून त्याचे अपहरण करण्यात आले. त्यावेळी भालेराव नगर असा पत्ता विचारण्याच्या बहाण्याने गाडी उभी करून मागून एकाने धक्का देत गाडीत खेचले होते सदर वाहन विप्रो मार्गे लडगाव नांदगाव रस्त्याच्या बाजूने गाडी नेली.
त्यानंतर काही वेळाने अपहरणकर्त्यांनी डॉ. बहुगुणे यांना मोबाईद्वारे संपर्क साधला आणि त्यांनी तुमचा मुलगा पार्थ आमच्या ताब्यात असून ५० लाखांची रोकड हवी. व न दिल्यास त्याला जिवंत ठेवणार नाही अशी तंबी दिली. दरम्यान बोलावलेल्या जागेवर डॉ निखिल बहुगुणे 10 लाख रुपये घेऊन घटनास्थळी गेले त्यावेळी अपहारणकर्त्याना पोलीस असल्याची खबर लागली आणि तेथून ते पसार झाले होते रात्री साडे अकरा वाजता गलवाडे रस्त्यावर डॉ. बहुगुणेंना अपहरणकर्त्यांनी बोलावले असता ते खासगी गाडीने चालकासह गलवाडे रस्त्यावर गेले. मात्र, त्यावेळी त्याठिकाणी अपहरणकर्ते आलेच नाहीत. दरम्यान, अमळेनर पोलिसांनी शहराला साध्या वाहन आणि साध्या वेशात घेराव घातला. त्यावेळी आरोपींना कुणकुण लागताच अमळगाव येथील पुलावर पार्थला एकट्यालाच सोडून अपहरणकर्त्यांनी पळ काढला होता. यानंतर डॉ बहुगुणे यांनी 4 जानेवारी 2017 रोजी पोलिसात तक्रार दाखल केली होती त्यावरून गुन्हा दाखल झाला होता त्यानंतर आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा जळगाव येथील एपीआय रघुनाथ धारबडे यांनी जेरबंद करून अमळनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. दरम्यान सदर खटला सर्व आरोपी कारागृहात असतांना सुरू होता. यात एकूण 9 साक्षीदार तपासण्यात आले त्यात प्रमुख साक्ष पार्थ याची ठरली त्याने अपहरणकर्त्याला ताबडतोब ओळखले होते याबरोबर डॉ निखिल बहुगुणे ओळख परेड घेणारे निवासी नायब तहसीलदार राजेश अमृतकर, यात वेगवेगळ्या प्रकारचे 18 पंचनामे करण्यात आले होते त्यातील पंच संदीप भगीरथ सराफ यांचीही साक्ष महत्वाची ठरली.तपास अधिकारी विकास वाघ आदींच्या साक्षी झाल्या यात सरकारी वकील किशोर आर पाटील मंगरुळकर व फिर्यादी पक्षातर्फे एड एम जे बागुल व एड जी व्ही विंचूरकर यांनी काम पाहिले
यातील सर्व आरोपी शहरात माऊली सुजल अक्वा नावाचा मिनरल प्लांट चालक महेश विनायक खांजोडकर, वय 34, भाऊ सुनील विनायक बारी वय 38, रा बालाजीपुरा झामी चौक अमळनेर, भरत दशरथ महाजन वय 26, रा.शिवम नगर अमळनेर सदर मिनरल अक्वा वर जार वाटप करणारा शुभम उर्फ शिवम गुलाब शिंगाने, वय -21 रा.भोईवाडा, सदर हमाली करणारा भटू हिरामण बारी – रा. बडोदा मूळ अमळनेर रिक्षाचालक, अक्वा गाडीवरील चालक अनिल नाना भिल वय 22 रा. मरिमाता मंदिराजवळ बहादरपूररोड अमळनेर यांना येथील जिल्हा व सत्र अतिरिक्त न्यायाधीश व्ही पी आव्हाड, यांनी भादंवी कलम 364 (अ )प्रमाणे अपहरण केले म्हणून जन्मठेप व तीन हजार रुपयांचा दंड व दंड न भरल्यास 3 महिने शिक्षा तर कलम 120 म्हणजे कटकारस्थान रचणे हे सिद्ध झाल्याने त्यातही जन्मठेप व 2 हजार रुपयांचा दंड व दंड न भरल्यास 2 महिने शिक्षा अशी शिक्षा सुनावली आहे.