अमळनेर (प्रतिनिधी) येथील जी.एस.हायस्कूलच्या करुणा क्लबच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारात एका बगळ्याचा जीव वाचवीला. त्यांचे शिक्षकांडून कौतुक करण्यात आले.
शाळेत वार्षिक परीक्षा सुरू असून वार्षिक परीक्षेचा पेपर झाल्यानंतर इयत्ता सातवीचे विद्यार्थी यश विनोद धनगर व रोहित मनोहर पाटील यांना शालेय प्रांगणामध्ये बगडा जखमी अवस्थेत पडलेला दिसला त्यावेळी त्यांनी शाळेचे शिक्षकजी.एस. चव्हाण यांच्या मदतीने त्या बगळ्यावर प्रथमोपचार केले. प्रथमोपचारात त्याला साखरेचे पाणी पाजले नंतर जखम झालेल्या जागेवर हळद टाकली नंतर त्या बगळ्याला करुणा क्लबचे डी. एन पालवे यांच्या स्वादिन केले. त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक बी.एस.पाटील यांनी विद्यार्थी यश,रोहित व शिक्षक गणेश चव्हाण यांचे कौतुक करून विद्यार्थ्यांनी प्राणीमात्रांवर दया करावी, असे सांगून करूणा क्लबशी जुडावे असे आवाहन केले.