अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील वावडे येथे बी. बी. ठाकरे महाविद्यालयातील सन १९९६-९७ च्या १० वीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा रंगला. उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
या कार्यक्रमाला ७० ते ८० माजी विद्यार्थी विद्यार्थीनी यांनी हजेरी लावली. वावडे परिसरातील जवखेडे, मांडळ, आर्डी, अनोरे, तरवाडे या गावांचे विद्यार्थी उपस्थित होते. माजी मुख्याध्यापक गंभीर चौधरी, पी. बी. ठाकरे, आर. बी. पाटील, वाय. जी. पाटील, जे. व्ही. पाटील व शाळेचे मुख्याध्यापक सुनिल पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला सन १९९७ च्या बॅचने शाळेसाठी ऋणबंधन करिता रंगकाम करण्याचा संकल्प केला. क्रार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. चेतन ठाकरे, सुरेश ठाकरे, पंकज ठाकरे, योगेश पाटील, चंद्रकांत महाजन, विनोद पाटील, कैलास कुभार, जवखेडे येथील मनोज पाटील, सतिलाल माळी, तळवाडे येथील नामदेव पाटील, रंगराव पाटील मांडळचे राहुल पाटील यांनी परिश्रम घेतले.