दुचाकीला भरधाव बसने धडक देत पती पत्नीला ५० ते ६० फूट नेले फरफटून

अमळनेर (प्रतिनिधी) शेतात जाणाऱ्या दाम्पत्याच्या दुचाकीला  भरधाव येणाऱ्या बसने धडक दिल्याने पती पत्नी गंभीर जखमी झाले. दोघांना तब्बल ५० ते ६० फूट ओढून नेले. महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी  धुळे येथे रवाना करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

   याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, तालुक्यातील गडखांब येथील मुरलीधर रामचंद्र पाटील व लता मुरलीधर पाटील हे दोघे मोटरसायकलवर शेतात दहिवद कडे जाताना समोरून चोपड्याकडून अमळनेर कडे येणाऱ्या यावलच्या बस (क्रमांक एम एच २० बी एल २६५६) ने जोरदार धडक देऊन मोटरसायकलसह पती पत्नीला तब्बल ५० ते ६० फूट ओढून नेले. मोटरसायकल बस खाली आल्याने लताबाई गंभीर जखमी झाली असून तिला धुळ्याला हलवण्यात आले आहे. तर मुरलीधर याना अमळनेर येथे उपचारासाठी आणण्यात आले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *