नव्याने होणाऱ्या विकास कामांमुळे अमळनेरच्या धार्मिक पर्यटनाला मिळणार प्रोत्साहन
अमळनेर (प्रतिनिधी) येथील श्री वर्णेश्वर महादेव मंदिर संस्थान परिसराच्या २.४० कोटीच्या विकास कामांचे भूमिपूजन आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार स्मिता वाघ या होत्या.
श्री वर्णेश्वर महादेव मंदिर संस्थान परिसरात होत असलेली विकास कामे अमळनेरचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहेत, असे आमदार अनिल पाटील यांनी सांगितले. खासदार स्मिता वाघ यांनी श्री वर्णेश्वर महादेव मंदिर पुरातन असून नव्याने होणाऱ्या विकास कामांमुळे अमळनेरच्या धार्मिक पर्यटनाला प्रोत्साहन मिळेल असे सांगितले. श्री वर्णेश्वर महादेव मंदिर संस्थानचे अध्यक्ष सुभाष चौधरी यांनी उपस्थित प्रमुख अतिथी यांचे स्वागत व सत्कार ट्रस्टतर्फे केला. याप्रसंगी मंचावर संस्थेचे ट्रस्टी संजय पाटील, संजय शुक्ल, अर्बन बँकेचे व्हाईस चेअरमन रणजित शिंदे, ॲड. व्ही. आर. पाटील, भिकन वाडीले, कृ.उ .बा.संचालक हिरालाल पाटील, भाजप शहराध्यक्ष विजय राजपूत, सेवानिवृत्त न्यायाधीश गुलाबराव पाटील, मराठा समाज कार्यालयाचे अध्यक्ष जयवंतराव पाटील, खा. शि. मंडळाचे संचालक हरी भिका वाणी आदि प्रमुख मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी श्री वर्णेश्वर मंदिर परिसरात चोपडा रोड ते श्री वर्णेश्वर महादेव मंदिर या रस्त्याचे भूमिपूजन, भक्तनिवास असलेल्या समाज भवनाचे भूमिपूजन, श्री वर्णेश्वर महादेव मंदिर परिसरातील तलावाचे सुशोभिकरण व मंदिर परिसराच्या वॉल कंपाऊंडचे नारळ फोडून व कुदळ मारून मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. उपस्थित प्रमुख मान्यवरामध्ये हेमंत भांडारकर, राजू फाफोरेकर, देविदास देसले, सुनिल पाटील, ॲड. तिलोत्तमा पाटील, महेश कोठवदे, डॉ. संजय शहा, गणेश पाटील, राजेंद्रभोला टेलर, भरत परदेशी, विजय पवार, रामराव पवार, पायल पाटील, अनिल कासार, हेमंत पवार, सुरेश पाटील आदिंसह शिवभक्त व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रामराव पवार, नारायण बडगुजर, राजू देसले, भावेश चौधरी, सतीश धनगर आदींसह श्री वर्णेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आत्माराम चौधरी यांनी केले.