१ मे महाराष्ट्र दिनापासून अमरण उपोषणाचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भुषण भदाणे यांचा इशारा
अमळनेर (प्रतिनिधी) पालिकेतील पाणीपुरवठा विभागात एकाच ठेकेदारच्या ३ एजन्सीना काम देऊन शासकीय दरापेक्षा ४० ते ५० पटीने जास्त दराचे वार्षिक कार्यादेश देऊन मोठया प्रमाणावर भ्रष्टाचार केला आहे, याची चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भुषण संजय भदाणे यांनी केली आहे. चौकशी न झाल्यास १ मे महाराष्ट्र दिनापासून अमरण उपोषण करण्याचाही इशारा दिला आहे.
भदाणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात निवेदन वजा पालिकेची तक्रार करून झालेला भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणला आहे. अमळनेर शहरातील नगरपालिकेत मोठया प्रमाणावर भ्रष्टाचार मागील काही वर्षापासुन सुरू आहे. त्यात अमळनेर शहरातील पाणीपुरवठा विभागात मोठया प्रमाणावर भ्रष्टाचार करण्यात आला आहे. यात विविध कामे चुकीच्या पध्दतीने राबविण्यात आली आहे. तसेच मागील काही वर्षापासुन नगरपलिका वार्षिक फंडातील कामे व त्या कामांची मागील वार्षिक कार्य आदेश आहेत. जर बघितल्या तर त्यात मोठया प्रमाणावर भ्रष्टाचार आहे. एकाच ठेकेदारच्या ३ एजन्सी आहेत.आदिनाथ कार्पोरेशन, वरद कॉम्प्युटर, श्री. जी. सेल्स या तिनही एजन्सीच्या नावाने मागील काही वर्षापासुन पाणीपुरवठा विभागातील सर्व वार्षिक कार्यादेश देण्यात आले आहे. कामांच्या मागील वर्षाच्या कार्यादेशात निर्देशनात येईल की शासकीय दरापेक्षा ४० ते ५० पटीने जास्त दराचे वार्षिक कार्यादेश देऊन मोठया प्रमाणावर भ्रष्टाचार केला आहे. या संपुर्ण प्रकरणाची चौकशी समिती नगरपलिका स्तरावर न होता मंत्रालयीन स्तरावर व्हावी. यामध्ये अधिकाऱ्यांच्या संगम मताने हे सर्व प्रकार झाले आहे. संबंधीत ठेकेदाराला ब्लॅक लिस्टेड करुन संबंधित ठेकेदारसह अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा. तसेच असाच एक प्रताप या ठेकेदाराने पाणीपुरवठा विभागात केला होता. अमळनेर शहरात पाईप लाईनची झालेली कामे जिल्हा नियोजन मधुन परत मंजुर करुण पुन्हा एकदा कामाचे बिल काढण्याचे प्रयत्न अधिकाऱ्यांच्या संगममताने केला गेला होता. तो उघडीस आणल्यानंतर त्या कामांचा कार्यदेश रद्द करुण नविन प्रशासकीय कामे टाकली व मंजुरी मिळाली.
असे अनेक भ्रष्टाचाराचे प्रकार अमळनेर शहरातील नगरपलिकेत सुरु आहे. संबंधित मागण्यांची लवकरात लवकर चौकशी व्हावी. १ मे पर्यंत चौकशी न झाल्यास १ मे महाराष्ट्र दिनापासून नगरपरिषेत असंख्य नागरिकांना घेऊन अमरण उपोषण करण्याचा इशारा भदाणे यांनी दिला आहे. हे निवेदन उपमुख्यमंत्री, अजित पवार, उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथराव शिंदे, मुख्यधिकारी, नगरपरिषद, अमळनेर यांना ही देण्यात आले आहे.