🤩 महाराष्ट्राने नवी मुंबईतील डीपीएस वेटलँडला फ्लेमिंगो संवर्धन राखीव म्हणून घोषित केले
◾️महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाने (SBWL) ही घोषणा केली
◾️पश्चिम घाटातील देवराई (पवित्र मानल्या जाणाऱ्या अभयारण्यांचे) संरक्षण करण्याचा निर्णयही घेण्यात आला.
◾️नवी मुंबईतील DPS पाणथळ जागा फ्लेमिंगो संवर्धन राखीव म्हणून घोषित केली.
➖
🤩 जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती अरुण पल्ली यांनी शपथ घेतली.
◾️ सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून संजय परिहार आणि शहजाद अझीम या न्यायिक अधिकाऱ्यांच्या नियुक्तीच्या प्रस्तावाला मान्यता दिली.
➖
🤩 काही महत्वाच्या Oneliner
◾️अमेरिकेने चिनी आयातीवर 245% पर्यंतचे जकातदार शुल्क लादण्याची घोषणा केली आहे.
◾️सुदर्शन पटनायक यांना युनायटेड किंग्डममध्ये “द फ्रेड डॅरिंग्टन पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले.इंग्लंडमधील वेयमाउथ येथे झालेल्या ‘सँडवर्ल्ड 2025 आंतरराष्ट्रीय वाळू कला महोत्सवात’ वाळू कला क्षेत्रातील त्यांच्या विशेष योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात आला.
➖
🤩 भारताने राष्ट्रीय डोप चाचणी प्रयोगशाळेत अॅथलीट पासपोर्ट व्यवस्थापन युनिट (एपीएमयू) चे उद्घाटन केले
◾️जगातील हे 17 वे असे युनिट आहे.
◾️ठिकाण – नवी दिल्ली
◾️उद्घाटन – केंद्रीय क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी
◾️खेळाडूंच्या रक्त आणि स्टिरॉइड पातळीचे निरीक्षण केले जाईल जेणेकरून कोणतीही अनैतिक पद्धत अवलंबण्यापूर्वी ती शोधता येईल
📺 आजच्या “न्यूज पेपर” मधील महत्वाच्या बातम्या आणि त्यांचे विश्लेषण एकदा वाचून घ्या 🎯
——————————————-
✍️ संकलन :- ©चालू घडामोडी 2025🔥खबरीलाल