ब्रेकींग न्युज………

पार्थ बहुगुणे अपहरण प्रकरणात जिल्ह्यातील प्रथमच कारवाई ; एकाच वेळी सहा आरोपींना जन्मठेप

५० लाखांचे कर्ज फेडण्यासाठी अमळनेरच्या मुलाचे केले होते अपहरण

अपहरण प्रकरणात वापरण्यात आलेली मारुती कार व दुचाकी

अमळनेर येथील डाॅ. निखिल बहुगुणे यांच्या मुलाचे ३ जानेवारी २०१८ राेजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास अपहरण झाले हाेते. मात्र, पाेलिसांनी लावलेल्या सापळ्यामुळे अपहरणकर्त्यांनी मुलाला जानेवारीला पहाटे साेडून दिले हाेते. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अमळनेर शहरातील अाणि बडाेदा येथील अशा सहा संशयिताना अटक केली होती. भिशीमुळे झालेल्या ५० लाखांच्या कर्जामुळे अपहरण केल्याची कबुली त्यांनी पाेलिसांना चाैकशीत दिली.
दरम्यान तब्बल 2 वर्षे खटला चालू होता त्या सहा आरोपींना न्यायालयाने अखेर न्यायाधिश व्ही पी आव्हाड यांनी दोन कलमात सर्व सहाही आरोपी महेश विनायक खांजोडकर वय २३ , सुनिल विनायक बारी वय ३६ , भरत दशरथ महाजन २४ , शुभम उर्फ शिवम गुलाब शिंगाने , अनिल नाना भिल वय २४ भटू हिरामण खांजोडकर,या आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. याकामी सरकारी ऍडव्होकेट किशोर बागुल यांनी कामकाज पाहीले.
दरम्यान जिल्ह्यातील व अमळनेर न्यायालयातील ही शिक्षा पहीलीच असून यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *