मुस्लिम युथ सेवा फाऊंडेशन घेणार पुढाकार

अमळनेर -शहरातील गंधलीपुरा भागातील वेश्यावस्ती व वेश्याव्यवसायाच्या विरोधात उग्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला असून शहरातील मुस्लिम युथ सेवा फाउंडेशन यासाठी पुढाकार घेत असल्याची माहिती फाऊंडेशनच्या पदाधिकाऱयांनीपत्रकार परिषदेत दिला.
या प्रसंगी फाऊंडेशनचे अध्यक्ष मौलाना रियाज यांनीं माहिती दिली की, अमळनेर हि संतांची भूमी आहे, इथला इतिहास हा क्रान्तिकारकांचा आहे, या नगरीत जागतिक स्तरावरील धार्मिक स्थळे आहेत, हि भूमी पूज्य साने गुरुजींची कर्मभूमी म्हणून ओळखली जाते, उत्तमराव पाटील तथा लीलाताई पाटील यांच्या सारख्या क्रान्तिवीरांची भूमी, संत सखाराम महाराजांची समाधी असलेली प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेली भूमी आहे, अमळनेरला शैक्षणिक व सांस्कृतिक वारसा लाभला आहे आणि असे असून सुद्धा निवळ शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या वेश्यावस्ती मुळे शहराचे नाव हे बदनाम होत आहे, यामुळे शहरात गुन्हेगारीचा प्रश्न दिवसें दिवस गंभीर होत चाललेला आहे, या वस्तीच्या आजूबाजूला धार्मिक स्थळे असून तिथे बहुजनांचे आराध्यदैवत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महाराष्ट्रातील दोन नंबरचा उंच असलेला पुतळा असल्याकारणाने अनेक लोक बाहेरगावाहून दर्शनाला येत असतात, अतिशय गंभीर बाब म्हणजे या परिसरात राहत असलेल्या नागरिकांच्या मुला-मुलींच्या लग्नाचा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे, या वेश्यावस्तीत येणारे आंबट शौकिन कधी कधी सज्जन नागरिकांच्या घरात घुसल्याचा प्रकार अनेकदा घडलेला आहे, आम्हीं अनेकदा पोलीस प्रशासन सह जळगाव जिल्हा अधिकारी व पोलीस अधीक्षक यांना निवेदने दिले आहे, अनेकदा पोलीस प्रशासनाकडून या वस्तीवर कार्यवाही सुद्धा करण्यात आल्या असता हा धंदा लहान मुलींच्या करवे करून घेणाऱ्यां वर पोस्को कायद्या अंतर्गत कार्यवाही सुद्धा झाली आहे , तरीही कायद्याच्या पळवाटा शोधून स्थानिक काही राजकीय लोकांच्या मदतीने सदर अनैतिक व्यवसाय सर्रास सुरु आहे, याकरिता मुस्लिम युथ सेवा फाउंडेशन हे या वस्ती विरोधात मोठे आंदोलन उभारणार आहे, वेळ पडल्यास जेलभरो सुद्धा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच या महिलांना शहराबाहेरील जागेत त्यांचे पुनर्वसन करावे जेणे करून शहरातील कायदा सुव्यस्था चांगली राहील, अश्या प्रकारच्या मागण्या या वेळी करण्यात आल्या. भारतात सर्व नागरिकांना मुक्तपणे वावरण्याचा, राहण्याचा अधिकार दिला आहे याचा अर्थ स्वैराचाराणे वागणे असा होत नाही. यामुळे अमळनेरात या वेश्याव्यवसायाला जनतेमधून प्रखर विरोध होतांना दिसत आहे.यावेळी कुदरत अली,उपाध्यक्ष गुलाम नबी पठाण,शेरखा पठाण,जाकीर शेख,मसूद मिस्तरी,अख्तर अली,असिर पठाण,नावेद शेख,अकलाग भाई,फारुख सुरभी,शराफत अली,जलाल भाई,इकबाल शेख यासह समाज बांधव उपस्थित होते.