अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथील भूमी अभिलेख कार्यालयासमोर लावलेल्या मोटरसायकल च्या डिकीतून अज्ञात चोरट्यांनी सुमारे 70 हजार रुपये चोरून नेल्याची घटना आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली
वसंत उंबर पाटील रा मेहरगाव ता अमळनेर यांच्या मालकीची मोटरसायकल क्र एम एच 19 ए एस 7767 ही दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास स्टेशन रोडवरील भूमी अभिलेख कार्यालयासमोर लावून चहा पिण्यासाठी गेले असता मोटर सायकलच्या डिक्कीत असणारे 70 हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली असून याबाबत वसंत पाटील यांनी दिलेल्या फिर्यादी वरून अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल पुरुषोत्तम पाटील करीत आहेत