एस टी अपघातात दुर्देवी मृत्य झालेल्या मोर्शी येथील वाहकाच्या कुटुंबियास अमळनेर आगारातुन आर्थिक मदत

अमळनेर-अमरावती विभागातील मोर्शी आगारात मागील महिन्यात अनियंत्रित बसने वाहकास चिरडल्याने त्याचा मृत्यू झाला होता,या घटनेने दोन वर्षीय निरागस बालिकेचे पितृछत्र हरपल्याने अमळनेर आगारातील अधिकारी व कर्मचारीं तसेच इतर मंडळींनी दातृत्व दाखवून एकूण 10,287 रुपयांची आर्थिक मदत मोर्शी आगाराकडे सुपूर्द केली.
अमळनेर आगारातील वाहक मनोज क्षत्रुग्ण पाटील यांनी संघर्ष ग्रुपच्या माध्यमातून मदतीचे आवाहन केले होते.दरम्यान दि 5 फेब्रुवारी 2019 रोजी मोर्शी आगराचे वाहक प्रविण किसनराव वैराळे,वय 30 वर्ष हे आपल्या आगारात ड्युटीची माहिती बघत असताना एस टी वर्कशॉप मधून निघालेल्या अनियंत्रित बसने त्यांना चिरडले होते,या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला तर एक कर्मचारी जखमी झाला होता.या घटनेत सदर वाहकाच्या पत्नीचा आधारस्थभ तर 2 वर्षीय चिमुकलीचे पितृछत्र हरपले,ही घटना संपूर्ण राज्यातील आगारात पोहोचल्यानंतर सर्व वाहक व कर्मचाऱ्यांनी हळहळ व्यक्त केली होती.
अमळनेर आगारात मनोज पाटील यांनी आवाहन केल्यानंतर रा प म अधिकारी व कर्मचारी यांनी सढळ हाताने मदत केली,तर टॅक्सी युनियनने देखील पुढाकार घेऊन अध्यक्ष बंडू केळकर यांनी युनियन तर्फे 1 हजार रु मदत दिली.तसेच अमळनेर येथील मूळ रहिवासी तथा हैद्राबाद येथे वास्तव्यास असलेले अविनाश बाविस्कर यांनीही दातृत्व दाखवून 5 हजारांची भरीव अशी मदत दिली.
या आवाहनातून एकुण 10,287/-रक्कम जमा झाली असून ही रक्कम मोर्शी आगरकडे सुपूर्द करण्यात आली आहे.तेथून एफ डी अथवा रोख स्वरूपात ती मदत स्व वैराळे यांच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचविली जाईल अशी माहिती मनोज पाटील यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *