
प्रतिनिधी अमळनेर ढेकू रोड येथील प्रभाग क्रमांक 7 मधील विविध कामांचा भूमिपूजन सोहळा 7 मार्च रोजी सायंकाळी 4 वाजता आयोजित करण्यात आला असून कार्यक्रमात श्रीराम नगर येथे खुल्या भूखंडात राष्ट्रसंत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज गुरु शिष्य भेटीचे शिल्प उभारण्याच्या कामाचे भूमिपूजन होणार आहे त्यासाठी छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यातील 7 किल्ल्यांची माती या शिल्पासाठी आणण्यात आली आहे
ढेकु रोडवर शिल्प प्रतिकृतीच्या ठिकाणी येथील ही माती टाकून कामास सुरुवात होणार आहे. तसेच लक्ष्मीनगर येथील भागात मुख्य रस्त्याचे डांबरीकरण अंदाजित रक्कम 12 लाख रुपयांचा शुभारंभ देखील यावेळी होणार आहे.
वृंदावननगर येथील रस्त्याचे रिमिक्स कॉंक्रिटीकरण करणे 8.50 लाख रुपये या कामाचा शुभारंभ आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते तसेच हिरा उद्योग समुहाचे चेअरमन डॉ रवींद्र चौधरी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे या कार्यक्रमासाठी राजमुद्रा फाउंडेशन, मोठेबाबा मंदिर समिती, अमळनेर तालुका वारकरी संप्रदाय व समस्त नागरिक ढेकू रोड व पिंपळे रस्त्यावरील परिसरातील यांचे सहकार्य मिळणार आहे कार्यक्रमात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन नगरसेवक श्याम पाटील यांच्या वतीने करण्यात आले आहे.