अमळनेर (प्रतिनिधी) ॲड. ललिता पाटील इंटरनॅशनल अमळनेर स्कूलमध्ये शाळेचा पहिला दिवस अत्यंत उत्साह व आनंदात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांचे औंक्षण करून व गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
शाळेत प्रत्येक वर्गात सजावट करण्यात आली. वर्ग व शाळेचा परिसर विवध रंगाचे फुग्गे व सजावटीचे साहित्य वापरून सजवण्यात आला होता. वर्ग, आवार सुशोभित करण्यात आले. शाळा व वर्गाच्या प्रवेशद्वारावर फुलांसह आंब्यांच्या पानांचे तोरण बांधण्यात आले. विद्यार्थ्यांचे औंक्षण करून व गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.पहिल्याच दिवशी शिक्षकांनी सकाळी परिपाठ घेतला. मंगळवारी शाळेची पहिली घंटा वाजली. शाळेचा पहिला दिवस अविस्मरणीय करण्याच्या दृष्टीने शाळेने जय्यत तयारी केली होती. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते ‘शैक्षणिक गुढी’ उभारत नव्या शैक्षणिक वर्षांनिमित्त वर्षांरंभ उपासना करण्यात आली. शाळेच्या पहिल्या दिवसी संस्थेचे सचिव प्रा. श्याम पाटील उपस्थित होते. शाळेचे प्रीन्सीपाल डॉ. निरज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचा नानिव शैक्षणिक वर्ष २०२५-२६ चा शुभारंभ मोठ्या उत्साह व आनंदी वातारणात झाला.