आ.शिरीष चौधरींचे प्रयत्न,मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत

अमळनेर(प्रतिनिधी)कर्करोगाच्या आजाराने पीडित असलेल्या अमळनेरातील तिघांना उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत मिळावी म्हणून आमदार शिरीष चौधरी यांनी पाठपुरावा केल्याने तिघांनाही एकूण 2 लाख 60 हजाराची मदत मंजूर होऊन मंजुरीचे पत्रक संबधित रुग्णांच्या नातेवाईकांना देण्यात आले.
शहरातील सौ सरला बाळासाहेब बोरसे रा. पवन चौक, अमळनेर 1 लाख, शेख जाकीर अहमद अब्दुल रज्जाक,रा इस्लामपुरा अमळनेर 1 लाख व जिजाबराव जगतराव पाटील,रा गांधली ता. अमळनेर,60 हजार याप्रमाणे संबंधितांना हि मदत मिळाली आहे. हे सर्व कर्करोगाच्या आजाराने त्रस्त असून त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदतीची अत्यंत गरज होती यासाठी आमदार चौधरी यांनी मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळावी अशी शिफारस करून पाठपुरावा केल्यामुळे ही मदत मिळाली आहे.
सदर मदतीचे मंजुरी पत्रक आ. चौधरीच्या हस्ते नातलगांना देण्यात आले, यावेळी गटनेते प्रवीण पाठक, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक महेश देशमुख, गांधली उपसरपंच दिनेश पवार, सुनील भामरे, हरीकृष्ण पाटील,मनोज श्री गणेश, अनिल पाटील, हिम्मतराव पाटील, चंद्रकांत साळी,उपस्थित होते.दरम्यान यापूर्वी देखील अनेक गरजू रुग्णांना आ चौधरींच्या प्रयत्नाने आर्थिक मदत मिळाली आहे.