पातोंडा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे आ.शिरीष चौधरींच्या हस्ते भूमिपूजन

अमळनेर(प्रतिनिधी)अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे नवीन इमारतीचे (५ कोटी २० लाख), तसेच समाज मंदिर व काँक्रीट रस्ताचे भूमीपूजन आमदार शिरीष चौधरी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
यावेळी गटनेते प्रवीण पाठक,राजेंद्र पाटील,किरण गोसावी, आबु महाजन, सरपंच रेखा किशोर पाटील, उपसरपंच सोपान लोहार, आरोग्याधिकारी देशमुख मॅडम, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र यादव, गजानन बिरारी, विनोद पवार, प्रवीण बिरारी,दीपक पवार सर देवीदास पाटील, पीक संरक्षण सोसायटी चेअरमन विलास संदांनशिव, भिमराव पवार, शशिकांत पारधी, चंद्रकांत शिरसाठ,आनंद कुंभार,राहुल महाले, उमेश सर, विलास गुरुजी, बंटी बोरसे, रमेश कुंभार, जयेश पारधी, आत्माराम पारधी, सुनील पारधी, बापू चौधरी, सुनील वानखेडे, बाळू शिरसाठ, समाधान संदांशिव, विक्रम संदांनशिव, हर्षल जाधव, भूषण बिरारी, नरेंद्र ठाकूर, किशोर पाटील, सोनू देवरे, देवीदास पाटील,सुकलाल बोरसे, आप्पा वानखेडे, आनंदा संनधानशिव, प्रकाश लांबोळे, निखिल चौधरी, मुन्ना भोई,रपेश सपकाळे, चेतन ढीवरे, चुडामन चौधरी, मोहन भोई, निकन भोई, बुधा भोई, गुलाब चौधरी, भटू चौधरी, लालचंद भोई, समाधान पाटील,राजेंद्र मराठे, व आरोग्य कर्मचारी व ग्रामस्थ यावेळेस उपस्थित होते.
दरम्यान हे प्राथमिक आरोग्य केंद्र १० खाटाचे असून येथे दोन डॉक्टर, एमबीबीएस, व बीएएमएस डॉक्टर तसेच कार्यकारी यंत्रणा राष्ट्रीय आरोग्य अभियान, १४ कॉटर्स, शस्त्रक्रिया विभाग प्रसूती गृह, किशोरी स्वास्थ्य कार्यक्रम रूम, औषधालय, रक्त लघवी तपासणी रूम आदी सुविधांसह गरोदर स्त्रियांचे संबंधित असणाऱ्या तपासण्या, टीबी, कुष्ठरोग,मलेरिया, एच आय व्ही तपासणी आदी सुविधा उपलब्द होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *