
अमळनेर(प्रतिनिधी) कळमसरे येथील रहिवासी श्रीमती मालतीबाई वामन महाजन यांच्या वयाची आज ७५ वर्ष पूर्ण होत त्यानिमित्ताने त्यांचे चिरंजीव फिल्म सृष्टीतील कला दिग्दर्शक रमाकांत महाजन यांनी सैनिक कल्याण निधी असलेला धनादेश तहसीलदार ज्योती देवरे यांच्याकडे सुपूर्द केला यावेळी माजी सैनिक जयदिप सिसोदिया, इंजीनियर प्रमोद रमेश चौधरी कळमसरे आदी उपस्थित होते.
डॉ मालती वामन महाजन या त्यांनी केलेल्या लोक-उपयोगी समाजकार्यामुळे त्या कळमसरे गावाच्या पंचक्रोशीत आधुनिक सावित्री म्हणून ओळखल्या जातात.समाज सेवेचा हा वारसा त्यांनी आपल्या व्यवसायाने डॉ असलेल्या पती कडून उचलला.त्यांचा वयाच्या ७५ वर्ष केल्यामुळे त्यांचा कळमसरे येथे गौरव करण्यात आला त्यावेळी ही देणगी जाहीर करण्यात आली होती.
उच्यविद्याविभूषित दोन्ही मुलं आपल्या भारतातील महानगरात मुंबई आणि बेंगळुरू शहरात वास्तव्यास आहेत, मोठा मुलगा रमाकांत महाजन हे हिंदी चित्रपट जगतात मोठे आर्ट डिरेक्टर म्हणून प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटेल असे कार्य करीत आहेत सिनेउद्योगातील असंघटित कामगारांन साठी युनियनच्या माध्यमातून त्या कामगारांना न्याय मिळवून देण्याचे कार्य करीत आहेत.तर मालतीबाई यांचे दुसरे चिरंजीव संजय महाजन हे गेली काही वर्षे आंतराष्ट्रीय स्तरावरील अनिमेशन व्हिएफएक्स साठी बंगलोर येथे कंपनीमध्ये कार्यरत आहेत.