पोलीस पाटील संघटना तालुका अध्यक्ष भानुदास पाटील यांचे मत

अमळनेर-गाव कामगार पोलीस पाटील यांचे दरमहा मानधन वाढत्या महागाईच्या विचार करता तुटपुंजे होते,हे मानधन वाढवून किमान दुप्पट मिळावे अशी मागणी आ स्मिता वाघ यांनी सातत्याने लावून धरली होती यासाठी विधानमंडळात विधिमंडळ आयुधांचा वापर करीत तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रत्यक्ष भेटीत व मुख्यमंत्री यांच्याकडे दोनवेळा बैठक घेऊन त्यांनी पोलीस पाटील वर्गाच्या आर्थिक अडीअडचणी मांडून त्यांनी हे मानधन वाढवून देण्याची मागणी सातत्याने केली आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मंत्रिमंडळ उपसमिती च्या बैठकीत सदर ची मागणी पूर्ण झाल्यामुळे ह्यापुढे पोलीस पाटील गाव कामगारांना दरमहा सहा हजार पाचशे रुपये मानधन मिळणार आहे तर गृहरक्षक दलाच्या जवानांच्या दैनिक भत्त्यात देखील वाढ करण्यात आली आहे.तसेच गांवकामगार पोलीस पाटील व गृहरक्षक दलाच्या जवानांना अटल पेन्शन योजना तसेच आरोग्य विम्याचाही लाभ मिळणार आहे ह्या याबाबत भानुदास पाटील यांनी समाधान व्यक्त केले आहे.तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जलसंपदा मंत्री गिरीष महाजन पालक मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत तर आ स्मिता वाघ यांचे विशेष आभार व्यक्त केले आहे.