
अमळनेर येथे ११ दिवसापासून साखळी उपोषण सुरू असतांना आज आंदोलनात जेलभरो करतांना पोलिसांच्या वाहनात उत्स्फूर्तपणे अटक देण्यासाठी मोठी झुंबड उडाली. समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या आधीच घोषणा देणाऱ्या शेकडो शेतकरी, युवक , राजकिय कार्यकर्त्यांनी वाहन भरून गेले.पोलिसांनी १२.१५ पासून आंदोलन कर्त्यांना अटकेचे सत्र सुरू केलं. १ तासाने दुपारी आंदोलन स्थळी सुटका केल्याचे जाहिर केले..

