अमळनेर(प्रतिनिधी)”सरकार मध्ये मंत्री असलो तरी एक शेतकरी म्हणून मी पाडळसे धरणाच्या जनआंदोलनात सहभागी आहे.अमळनेर, धरणगाव सह परिसरातील शेतकऱ्यांना समृद्धी देणारे धरण खासबाब म्हणून मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री यांनी तातडीने पूर्णत्वास न्यावे!” असे सहकार राज्यमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी पाठींबा दिला. साखळी उपोषण आंदोलनाच्या ११ व्या दिवशी राज्यमंत्री यांनी भेट देतांना डोक्यावर ‘पाडळसे धरण झालेच पाहिजे !’ या मागणीची टोपी घातली होती.आज रावेरचे मा.आ.शिरीष चौधरी,मा.आ. चिमणराव पाटिल यांनी भेट देऊन आंदोलनास पाठींबा दिला.
“धरण पूर्तीसाठी २ मार्च, दु.१२ ला जेलभरो आंदोलनात ६ तालुक्यातील जनतेनेसह सर्वपक्षीय कार्यकत्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे! असे जाहीर आवाहन जनआंदोलन समितीचे प्रमुख सुभाष चौधरी,शिवाजीराव पाटिल यांनी केले. मा.आ.शिरीष चौधरी यांनी व मा.आ.चिमणराव पाटील यांनी “अवर्षणप्रवण परिसरात धरणाचे रखडलेले काम भेदभाव न करता प्राधान्याने पूर्ण करावे!”असे जाहीर आवाहन केले.
आंदोलन स्थळी काँग्रेस पक्ष,शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह एव्हरग्रीन जेष्ठ नागरिक संघ,महाराष्ट्र राज्य असोसिएशन ऑफ लॅबोरेटरी अँनलिस्टस अमळनेर, अमळनेर शहर इलेक्ट्रिक व प्लंबर असोसिएशन, जवखेडा वि.का.सोसायटी, अमळनेर वितरक संघ,लोंढवे ग्रामस्थ, अमळनेर तालुका गटसचिव संघटना, अमळनेर ,महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट संघटना, अमळनेर संभाजी ब्रिगेड, सिनिअर सिटीझन क्लब,ज्ञानेश्वर पाठशाळा,शुक्ल यजुर्वेदीय ब्रह्मन् संस्था,ऋग्वेदी सहायक संस्था, पुरोहित सेवा संघ,ब्राह्मण युवा मंच,ब्राह्मण महिला मंच,ब्राह्मण सेवा संघाच्या वतीने प्रा.डॉ.प्रभाकर जोशी, सोमनाथ ब्रह्मे, चंद्रकांत कुलकर्णी, राजेंद्र खाडिलकर, संजय एकतारे,सुहास बोरकर, सुनिल मांडे, उमाकांत नाईक, प्रसाद जोशी,अरविंद काळे,सौ.शोभा देशपांडे, अरविंद जोशी,डॉ.शोभा देशपांडे, डॉ.अपर्णा मूठ्ठे, प्रा.डॉ.पी.व्ही.भावे, डॉ.सुहास देशमाने, यांचेसह समाज बांधवानी आज आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदविला.
आंदोलनास आज मा.प्राचार्य डॉ.अरविंद सराफ यांनी मार्गदर्शन केले. मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटिल, डॉ.राजेंद्र पिंगळे, काँग्रेसचे भागवत सूर्यवंशी, मनोज पाटील, सुलोचना वाघ,राष्ट्रवादी काँग्रेसच्या सौ.तिलोत्तमा पाटील,संजय पाटील, ऋषीकेश गोसावी आदिंनी भाषणे केलीत. यावेळी सेनेचे मोतिभाऊ पाटील, नवल पाटील पाळधी, नितीन निळे, मा.नगरसेवक संजय पाटील, देवेंद्र देशमुख, मोहन भोई, अनिल बोरसे,जीवन पवार,विजय पाटील,चंदू पाटील,गणेश मोरे यांचेसह काँग्रेसचे गोकुळ पाटिल, धनगर दला पाटील, प्रविण जैन, हिंमत देसले, सुरेश पिरण पाटील, अड.गिरीश प्रकाश पाटील , एसटी ट्रान्सपोर्ट चे एल.टी. पाटील, राष्ट्रवादीसाज शिवाजीराव पाटील, योजना पाटील,बाळू पाटील, निवृत्ती पाटिल,आशा चावरीया,आदिसह कार्यकर्ते उपस्थित होते.
पॅथॉलॉजीस्ट उदयकुमार खैरनार,भटू पाटील, अमोल शहा, लक्ष्मीकांत सूर्यवंशी, राहुल महाजन, शरद शेवाळे,संजय मुसळे,किशोर सूर्यवंशी, मनोज सूर्यवंशी, महेंद्र साळुंखे, योगेश अहिदे आदिंसह मोठ्यासंख्येने आंदोलनात सहभागी झाले.
चोपडा येथिल घोडेगाव येथिल डॉ. बी.आर.पाटील, राम पितांबर पाटील, प्रकाश पाटील, विश्वास पाटील,बशीर पिंजारी, आदिंसह ग्रामस्थांनी पाठिंबा दिला.
निंभोरा येथिल महिलांनी मोठ्या संख्येने साखळी उपोषनास दिवसभर शेतकरी गीते सादर करीत उपस्थिती दिली. यावेळी निभोरा येथिल दुगुबाई पाटिल,पायल पाटिल , मनिषा धनगर, प्रमिला धनगर, इंदूबाई धनगर, सुशीला धनगर, कमल मिस्तरी,ताराबाई धनगर, लताबाई पाटील, विमल पाटील,अनिता धनगर,जयश्री पाटिल, इंदिरा मिस्तरी, रत्ना धनगर, मालू धनगर,सरला धनगर, रजूबाई मिस्तरी, मंडा पाटील, सुशीला धनगर ,शालू मिस्तरी, हिराबाई पाटिल,नूतन पाटील आदिंसह महिला मोठ्या संख्येने सहभागी होत्या.