अमळनेर (प्रतिनिधी)अमळनेर येथील खान्देश शिक्षण मंडळ संचलित कै. पंढरीनाथ छगनशेठ भांडारकर काॅलेज ऑफ डी. फार्मसी चे प्राचार्य प्रा. रविंद्र गंगाराम माळी यांची भारत सरकारच्या पर्यावरण, वन आणि जलवायु परिवर्तन मंत्रालय अंतर्गत येणाऱ्यापशु कल्याण विभागाच्या प्राण्यांवरील प्रयोगांवर नियंत्रण व देखरेख ठेवणार्या समितीवर नाॅमिनी म्हणून निवड झाली आहे. .निवडी अगोदर प्रा. माळी यांनी दिल्ली येथे या विभागाने आयोजित केलेला प्रशिक्षण कोर्स पूर्ण केला व त्यानंतर विभागाची लेखी परीक्षाही उत्तीर्ण केली. त्यांच्या या निवडीबद्दल फार्मसी काॅलेजचे चेअरमन योगेश मुंदडे, खा. शि. मंडळाचे कार्याध्यक्ष नीरज अग्रवाल, कार्योपाध्यक्ष जितेंद्र जैन, सदस्य डॉ. बी. एस. पाटील, प्रदिप अग्रवाल, डॉ. संदेश गुजराथी, हरी भिका वाणी, कल्याण पाटील व चिटणीस प्रा. डाॅ. अरुण जैन यांनी अभिनंदन केले.