काँगेसचे सरकार आल्यास रखडलेले धरणाचे सिंचन प्रकल्प पूर्ण करणार! – काँगेस राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी
अमळनेर : पाडळसरे धरणाकडे भाजपा सरकारनं ५ वर्षात पूर्णतः दुर्लक्ष केले आहे. येणाऱ्या काळात आघाडीचे सरकार आल्यास जळगांव धुळे असे दोन जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना फायदेशीर धरण आघाडी सरकार सत्तेवर आल्यास पूर्ण करणार! असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत धुळे येथे जाहीर करताच खान्देशातील उपस्थित हजारो लोकांनी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद देऊन घोषणेचे स्वागत केले.
अमळनेर तालुक्यातील पाडळसरे धरणाचा विषय राष्ट्रीय पक्षांच्या सभांमध्ये ही गाजतोय येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पाडळसरे धरणाच्या आंदोलनाचे दूरगामी परिणाम सत्ताधाऱ्यांना भोगावे लागतील असे दिसते आहे.
आज धुळे येथे काँग्रेसच्या सभेला जाणारे चोपडा, रावेर, अमळनेर येथील काँग्रेस चे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपोषण स्थळी भेट देत होते. तसेच यावेळी रावेर येथील काँग्रेसचे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी ही आंदोलनात सहभाग नोंदवून धरणाचा प्रश्न समजून घेतला व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी धुळे येथील सभेत नेत्यांच्या कानावर पाडळसरे धरणाचा विषय टाकून ११ दिवसापासून सुरू असलेल्या आंदोलनाचे गांभीर्य लक्षात आणून दिले.