भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ व आ.सौ.स्मिता वाघ यांची भाजप सरकारमधील पत संपली – सुभाष आण्णा चौधरी

उद्या आंदोलन मंडप समोर दु.१२ वाजता जनआंदोलन समिती जेलभरो आंदोलन करणार….
अमळनेर(प्रतिनिधी) जलसंपदा मंत्री जिल्ह्यातील असूनही ना.गिरीश महाजन यांनी जाहीर २३०० कोटी निधी देण्याचे आश्वासन पाळले नाही तर भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ व आ.सौ.स्मिता वाघ यांची भाजप सरकारमधील पत संपली आहे! असा घणाघाती आरोप सुभाष चौधरी यांनी यावेळी लोकप्रतिनिधिंवर केला. शासनाने धरणासाठी भरघोस निधी द्यावा या मागणीसाठी २ मार्च ला उपोषण आंदोलन मंडप समोर दु.१२ वाजता जनआंदोलन समिती जेलभरो आंदोलन करणार आहे.अहिराणी घोषणांनी आजचा दिवस गाजला.

पाडळसे धरणासाठी १० दिवसनापासून जनआंदोलन सुरू असूनही शासनाने यंदाच्या बजेट मध्ये तुटपुंजी तरतूद पाडळसे धरणावर केल्याने आम्ही खचून न जाता आंदोलन तिव्र करून जनआंदोलनाच्या दबावाच्यामाध्यमातून धरणपूर्ती साठी रस्त्यावर उतरून संघर्ष करू! असे शिवाजीराव पाटिल यांनी जाहीर केले. यावेळी माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी धरणाबाबत कागदोपत्री सविस्तर माहिती दिली तर आंदोलन स्थळी राष्ट्रवादी काँगेसतर्फे सचिन पाटिल यांनी १ मार्चला आश्वासन न पाळणाऱ्या जलसंपदा मंत्री चे प्रेतयात्रा काढण्यात येईल असे जाहीर केले.रांगोळीकार नितीन भदाणे यांनी धरणासाठी वेळ पडल्यास देहत्याग करेल!असे जाहीर केले.भाजप पाडळसे धरणाला न्याय देणार नाही हे आता जनतेला माहिती झाले असल्याचे मा.उपसभापती धनगर दला पाटिल व प्रा.सुभाष पाटिल यांनी सांगितले. तर गावरान जागल्या मंच विश्वास पाटील यांनी “केंद्र व राज्य सरकार शेतकरी विरोधी”असल्याची घणाघाती टिका केली. प्रा.शिवाजीराव गांधलीकर, हिरालाल पाटिल यांनी बहुजन क्रांती मोर्चा,किसान मोर्चाही २ मार्चला जेलभरो आंदोलनात सहभागी होईल असे जाहीर केले. सानेगुरुजी स्मारक कर्मभूमी च्या कार्यकर्त्या दर्शना पवार यांनीही आंदोलनास संबोधित केले.
अहिराणी घोषणा
जलसंपदा मंत्री तुमना जिल्हाना
आमना काय कामना!
७/७ आमदार तुमना भागना
आमना काय कामना!
२-२ आमदार अम्मयनेरना
आमना काय कामना!
हिरामण कंखरे यांनी अहिराणी घोषणा दिल्यात….
आज समस्त लाडशाखीय वाणी समाज पंच मंडळाने आंदोलनास पाठिंबा देत उपोषनात सहभाग नोंदविला.अध्यक्ष प्रकाश अमृतकार, उपाध्यक्षा सौ.अरुणा अलई , प्रा.दत्तात्रय भामरे, सुनिल भामरे, सौ. अर्चना तलवारे,गजानन धांडे,नारायण खोडके,भिका वाणी, दिनकर नागदकार, दिपक तलवारे,चंद्रकांत येवले, गिरीश शिरोडे, अनिल वाणी,सोमनाथ नेरकर,चंद्रकांत पुरकर,गजानन कोतकर, आदिंसह समाजाचे लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.अहिर सुवर्णकार युनियनतर्फे उपाध्यक्ष राजेंद्र पोतदार, अध्यक्ष जितेंद्र भामरे, सचिव निलेश देवपूरकर आदिंनी उपस्थिती देत पाठींबा पत्रक दिले. दि.सोनार अँड सराफ असोसिएशन चे अध्यक्ष मदन सराफ,सचिव संजय विसपुते यांनी पाठिंबा दिला.राजपूत एकता मंचतर्फे अनिल पाटील,विजयसिंग राजपूत,चंदुसिंग परदेशी,रणजित पाटील, गुलाबसिंग पाटील,नरेंद्रसिंग ठाकोर,चेतन राजपूत, राजेंद्र सिंह परदेशी, दिलीपसिंग भोरटेके,मुकेश राजपूत, महेंद्र पाटिल आदिंसह अनेकांनी उपस्थिती दिली.इस्टेट ब्रोकर संघटनेचे सुभाष पाटील,अरुण पाटील, ज्ञानेश्वर पाटील,राजेश पाटील, अशोक मोरे,आबा फुलपगारे, लोटन पाटील, हेमंत कोळी,सुरेश ठाकूर, किरण सावंत,जितू जोशी,प्रकाश बडगुजर, विष्णू जाधव, असगर अली बोहरी,बाळासाहेब महाजन आदिंसह सदस्य मोठया संख्येने सदस्य आंदोलनात उपस्थित होते. पातोंडाचे ग्रामस्थ जगदीश पवार,संजय पवार,मुकुंद पवार,विशाल पाटील, भरत बाविस्कर आदिंसह मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी पाठींबा देत सहभाग दिला.जुनोने ग्रामपंचायतचे रामलाल पाटिल,प्रकाश पाटील,लहू पाटील,दिनेश पाटील, रामकृष्ण धनगर,सौ.मनिषा पाटिल,भिमसिंग पाटिल हे सहकाऱ्यांसह मोठ्या संख्येने सहभागी झाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सचिन पाटील, मुख्तार खाटीक, अनिल शिसोदे,प्रा.सुरेश पाटिल,भागवत पाटील, सुनिल शिंपी, भिकन मालपुरे, विकास पाटील, उमेश सोनार,बापू कोळी हे कार्यकर्त्यांसह उपस्थित होते.
रंजाने गावच्या बचत गटांच्या महिला कार्यकर्त्या सपना पाटिल,सुवर्णा पाटील, भारती पाटील, भाग्यश्री पाटील, कोकीलाबाई ठाकूर,सुनीता पाटील ,कमल शिंपी,कल्पना पाटिल, प्रतिभा पाटील, मनीषा पाटिल,अरुणा पाटील, मंगल पाटील,अनिता पाटील, सुमन पाटील, टोंगल पाटील,वंदना पाटील, सुशिला पाटिल, रजूबाई धोबी आदि महिला उपस्थित होत्या तर बहुजन मुक्ती पार्टी चे संदिप सैंदाने, बांधकाम व्यावसायिक ओमप्रकाश मुंदडा, प्रा.अशोक पवार, समितीचे एस.एन.पाटिल, रामराव पवार, अजयसिंग पाटिल,रणजित शिंदे, डी. एम. पाटील,रवी पाटिल,सुनिल पाटिल, प्रशांत भदाणे,देविदास देसले, सुनिल पवार,एन.के.पाटिल,योगेश पाटिल, डॉ.देविदास पाटील (चोपडा) , सुहास एलमामे, नगरसेवक शेखा हाजी आदिंसह विविध संघटनांचे प्रतिनिधीनी आंदोलनात दिवसभर सहभाग नोंदविला.