अमळनेर तालुक्यातील पाडळसे धरणाला अत्यल्प निधी दिल्याबद्दल असमाधान व्यक्त करीत आ.शिरीष चौधरी यांनी काल अमळनेर तालुक्यातील सरपंचानां घेऊन मुख्यमंत्री यांची भेट घेतली.यावेळी धरणास भरघोस निधी मिळावा आणि जनआंदोलनाच्या लोकक्षोभाची दखल घ्यावी अशी मागणी त्यांनी केली. सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटिल यांच्यासह धुळे येथिल मा.आ.प्रा.शरद पाटील यांनी देखिल आंदोलनाची माहिती देऊन ज्यादा निधीची मागणी केली.यावेळी सेनेचे विजय पाटील व अमळनेर तालुक्यातील सरपंच उपस्थित होते.
विशेष म्हणजे आ.शिरीष चौधरी यांनी जनआंदोलन समितीची भेट मुख्यमंत्री यांच्यासोबत घालून द्यायची होती.मात्र समितीने मुख्यमंत्री यांच्या लेखी पत्राशिवाय भेट न घेण्याचे ठरविल्याने आ. चौधरी यांनी स्वतः तालुक्यातील सरपंचांना व मा.आ.प्रा.शरद पाटील यांना सोबत घेऊन अर्थसंकल्पातील ३२ कोटींच्या निधींवर समाधान न मानता धरणासाठी निधी मिळविण्याकरिता आपले प्रयत्न सुरूच ठेवले आहे.