अमळनेरात आगामी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

अमळनेर (प्रतिनिधी) आगामी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी तालुक्यात एकूण 1800 कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार असून पहिल्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात 900 जणांना प्रशिक्षण देण्यात आले प्रथमच व्ही व्ही पॅट यंत्राचा वापर करण्यात येणार असून कर्मचाऱ्यांनी हे यंत्र सूर्यप्रकाशात किंवा विजेच्या दिव्यात ठेवू नये आणि या निवडणुकीपासून 50 मॉक पोल तपासावेच लागतील अशी माहिती प्रांताधिकारी सीमा अहिरे यांनी अमळनेर येथील निवडणूक कर्मचाऱ्यांच्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात झालेल्या प्रशिक्षणात दिली

निवडणूक कार्यपद्धतीत काही प्रमाणात बदल झाले आहेत व्ही व्ही पॅट यंत्रबद्दल माहिती देताना अहिरे पुढे म्हणाल्या की हे यंत्र हाताळताना त्याचा खटका आडवा असल्याची खात्री करा कंट्रोल युनिट सुरू केले की 7 मतदान चिठ्या बाहेर निघतील त्यानंतर 50 मॉक पोल घ्यावे लागतील मतदानाच्या एक तास आधी किमान दोन उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत मॉक पोल घ्यावे ते उपलब्ध न झाल्यास 15 मिनिटे वाट पाहून तशी नोंद करून मॉक पोल सुरू करावे एका रोल मध्ये 1500 मतदान चिठ्या निघतील मात्र मॉक पोल च्या 50 व पहिल्या 7 चिठ्यांची स्वतंत्र नोंद घ्यावी
तहसीलदार ज्योती देवरे यांनी व्ही व्ही पॅट चे प्रात्यक्षिक दाखवताना गैर समजबाबत मार्गदर्शन करताना सांगितले की कंट्रोल युनिट सुरू करताच व्ही व्ही पॅट मधून पहिल्या सात मतदान चिठ्या बाहेर निघतील म्हणजेच हे यंत्र योग्य व व्यवस्थित आहे न्यायालयासमोर व्ही व्ही पॅट ची चाचणी घेण्यात आली आहे भारत निवडणूक आयोग पारदर्शी असल्यानेच जगभरात आपल्या लोकशाहीचे कौतुक होत आहे
तालुक्यात दोन दिवसात एकूण सहा टप्प्यांमध्ये 1800 कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे पहिल्या दिवशी 900 कर्मचार्यांना प्रशिक्षण देण्यात आले प्रथम पी पी टी वर चित्रीकरण दाखवण्यात आले त्यांनतर व्ही व्ही पॅट चे प्रात्यक्षिक दाखवून कर्मचार्यांनी स्वतंत्र यंत्रावर प्रात्यक्षिक केले प्रशिक्षण कामी नायब तहसीलदार वळवी , दिनेश सोनवणे , नितीन ढोकणे , नयिम मुजावर , भूषण पाटील , निवडणूक लिपिक प्रियांका पाटील यांचे सहकार्य लाभले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *