शासनाने तात्काळ दखल घ्यावी अन्यथा….?
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथील पाडळसरे जनआंदोलन समितीचे कार्य प्रेरणादायी असून जिल्यातील शेतकरी,व्यापाऱ्यांना बेरोजगार युवकांना नवसंजीवनी देणारे असून शासनाने त्वरित दखल घेऊन निर्णय घ्यावा.तसेच जनआंदोलन समितीचे कार्येकर्ते ग्रामीण भागात परिसर पिंजून काडून गावोगावी फिरून धरण व्हावे म्हणून परिश्रम घेत आहेत. आंदोलन पेटल्यास शासन जबाबदार राहील असे प्रतिपादन महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेश संघटक व क्रांतीसुर्य महात्मा फुले विचार मंच चे संस्थापक प्रवीण बी.महाजन यांनी महाराष्ट्र माळी समाज महासंघ प्रदेश कडून व महात्माफुलें विचार मंच तर्फे आलदोलन समितीला पाठिंबा देतांना केले. यावेळी भिलाली येथील माजी उपसरपंच दिनेश माळी,माळी समाजाचे अध्यक्ष दिलीप आत्माराम माळी नगरसेवक धनंजय महाजन, आर.एस. माळी, नगरसेवक अँड.सुरेश सोनवणे,उदयकुमार खैरनार,ग.का.सोनवणे, माळी महासंघाचे कार्यध्येक्ष गोपाल सुदाम माळी(देवळी)युवक ता.अध्यक्ष शिवाजी महाजन,शाखा प्रमुख श्रीकृष्ण माळी,विशाल देवरे,संजय महाजन यांच्या सह तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर कार्येकर्ते शाखा प्रमुख समाज बांधव महात्मा फुले विचार मंच पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी अनेक कार्येकर्त्यांनी साखळी उपोषणात सहभाग नोंदवला आहे.