धरणासाठी पेटलेले आंदोलन शासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे चिघळण्याची परिस्थिती निर्माण

मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटिल यांनी सध्याच्या सरकारमधील लोकप्रतिनिधीच्या काळात ८६ कोटी रुपये प्राप्त झाले असल्याचे निवेदन जनआंदोलन समिती समोर केले.

पाडळसे धरणाच्या पूर्ती साठी हमाल मापाडी संघटना,माळी समाज, मुस्लिम धर्मिय बांधवांनी साखळी उपोषण आंदोलनात सहभाग दिला

अमळनेर (प्रतिनिधी ) पाडळसे धरण जनआंदोलनाची दखल घेऊन धरणाचे काम युद्धपातळीवर शासनाने सुरू करावे म्हणून विविध संघटना स्वतंत्रपणे पुढे सरसावल्या असून धरणासाठी पेटलेले आंदोलन शासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे चिघळण्याची परिस्थिती निर्माण आहे.
पाडळसे धरण जनआंदोलन समितीने पंतप्रधान नरेंद्र मोदी,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धरणाचा समावेश दुष्काळ व्यवस्थापन अथवा नाबार्ड मध्ये करण्याचे मागणीपत्र पाठविले.
साखळी उपोषण आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी आज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेकडो हमाल मापाडी यांनी मार्केट चे कामकाज बंद पाडले आणि पाडळसे धरण पूर्ण झालेच पाहिजे अश्या घोषणा देत आंदोलन स्थळी येऊन आंदोलनात सहभागी झाल्याने धरण प्रश्नावर वातावरण तापत चालले असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
अमळनेर बहुजन क्रांती मोर्चा च्या वतीने आंदोलनास पाठींबा देतांना “१ मार्च ला जेलभरो आंदोलनात पाडळसे धरण युद्धपातळीवर पूर्ण करा!” हि मागणीही विविध प्रमुख मागण्यांसह करण्यात येणार असल्याचे बहुजन क्रांती मोर्चा च्या वतीनं रणजित शिंदे, प्रा.शिवाजीराव पाटिल, राजेश मोरे, विजय गाडे, संदिप सैंदाने,दिनेश बिऱ्हाडे आदिंनी उपोषण स्थळी जाहिर केले.
तर आंदोलनास पाठिंबा देणारे वेगवेगळ्या युवा संघटनांचे तरुण कार्यकर्ते ही सामूहिकपणे रास्ता रोको आंदोलन करण्याच्या तयारीत असून रास्ता रोको करण्याचेही जाहीर केले आहे.

समितीतर्फे पंतप्रधान, मुख्यमंत्री यांना मागणीपत्र रवाना….

आज जनआंदोलन समितीने निम्न तापी प्रकल्पांतर्गत समाविष्ट असलेल्या अमळनेर, चोपडा, पारोळा,धरणगाव,शिंदखेडा,धुळे या सहा तालुक्यांसाठी संजविनी असलेल्या पाडळसे प्रकल्पाचा समावेश दुष्काळ व्यवस्थापन कार्यक्रम अथवा नाबार्ड मध्ये समावेश करणे बाबतचे पत्र सुभाष चौधरी, प्रा.एस.ए. पाटिल यांनी पाठविले आहे.
सामाजिक पातळीवरही समाजसमूहांनी धरण पूर्ती च्या प्रश्नावर आंदोलनात उडी घेतली आहे. अमळनेरातील माळी समाजाने अखिल भारतीय महात्मा फ़ुले समता परिषदच्या माध्यमातून जाहीर पाठिंबा दिला.आंदोलनात गंगाराम निंबा महाजन,मनोहर महाजन,किशोर माळी, गुलाबराव माळी, नगरसेवक भाऊसाहेब महाजन,ज्ञानेश्वर महाजन, कैलास महाजन,अड.सुदाम महाजन,अबू महाजन, भिमराव महाजन,आदींनी उपोषनात सहभाग घेतला. तर मुस्लिम धर्मियांच्यावतीने एकत्रितपणे अमळनेर इदगाह मुस्लिम कब्रस्तान ट्रस्ट च्या माध्यमातून अध्यक्ष फैय्याज खां वाहब खा, इकबाल मिस्त्री,नगरसेवक सलिम टोपी,नगरसेवक शेखा हाजी साहब,मा.नगरसेवक फिरोज पठाण, जाकीर हुसेन,अ. सत्तार रमजान,रफिक मिस्त्री,अ. सत्तार रज्जाक, अखलाक भाई,फारुख भाई,अफरोज भाई आदिसह मुस्लिम बांधव उपोषणास बसले होते.महाराष्ट्र राज्य किसान सभेतर्फे जिल्हासचिव कॉ ज्ञानेश्वर पाटिल,नरेन्द्र पाटिल आदीनी पाठिंबा दिला.
तर पाडळसे आंदोलनास अमळनेर सरपंच सेवा संघानेही पाठिंबा दिला असून जिल्हाध्यक्ष उमेश पाटिल,तालुकाध्यक्ष जितेंद्र पाटिल,सरचिटणीस प्रा.सुनिल पाटिल, नरेंद्र पाटिल सबगव्हान,गलवाडे खु चे डी. एस.पाटिल, कावपिंप्री चे दिनेश पाटिल,झाडी चे भुपेंद्र पाटिल, कंडारीसाज, रामकृष्ण पाटिल,गलवाडेचे सुनिल पवार आदिसरपंच सहभागी झालेत. तर अखिल भारतीय सरपंच परिषद अंतर्गत पंचायत राज विकास मंच तर्फेही अध्यक्षा सौ.उज्वला बाई महेश पाटिल,सुरेश अर्जुन पाटिल,उपाध्यक्षा कोकीळाबाई गोसावी,अनिल शिसोदे, रामकृष्ण पाटिल,किशोर सूर्यवंशी, अशोक पाटिल, जोत्सना लोहार,राजेंद्र पाटिल, अड.अमोल ब्रह्मे,नरेंद्र पाटिल आदींनी प्रत्यक्ष उपस्थिती देत पाठिंबा दिला.

चोपडा तालुक्यातून पाठींबा

जळगांव महापौर किशोर पाटिल, सौ.माधुरी पाटिल, यांचेसह वेले चोपडा येथिल संदिप पाटिल,गलवाडे चोपडा सरपंच किशोर बोरसे व शेतकरी बांधव,गोडवेल चे चंद्रकांत पाटील,धुपे येथील जगदिश पाटिल, तालुका उपसा सिंचन समितीचे सचिव रमेश बोढरे, नंदाबाई चौधरी, वैशाली चौधरी,भूमिका चौधरी, मनिषा पंकज चौधरी आदिंसह कृषी उत्पन्न बाजार समिती चे मा.उपसभापती नंदकिशोर व्यंकट पाटिल, ,निमझरी मा.सरपंच मधुकर पाटिल यांचेसह इदापिंप्री, कलाली, लोंढवे, दहिवद, सोनखेडी, नंदगाव,डांगरी,बोरगाव,अमळगाव,लोण, भरवस,मंगरूळ येथिल ग्रामस्थ सहभागी झालेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *