
अमळनेर येथिल पाडळसे धरण जनआंदोलन समितीचे आंदोलन ८ दिवसापासून सुरू असून धरणास अपेक्षित निधी मिळणेबाबत गतिमानतेने कार्यवाही होत नसल्याने पाडळसे धरण जनआंदोलन समितीचे आंदोलनास सामाजिक संघटना,राजकिय,शैक्षणिक,व्यापारी संघटनासह सर्वच स्तरातून भरघोस पाठींबा मिळत असल्याने मा.मुख्यमंत्री यांच्या दालनात जलसंपदा मंत्री यांनी जनआंदोलन समितीसोबत बैठक लावावी असे कळकळीचे पत्र आ.शिरीष चौधरी यांनी जलसंपदा मंत्री यांना भेटून पत्र दिले, सदर पत्रावर बैठक लावण्याचे लेखी आदेश जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिले असल्याचे आ.शिरीष चौधरी यांनी कळविले आहे.