मा.मंत्री.आ.एकनाथराव खडसे यांनी आंदोलनास दुरध्वनीने संबोधित करीत साखळी उपोषणास दिला जाहीर पाठींबा
अमळनेर(प्रतिनिधी) “लोकप्रतिनिधींच्या सामूहिक प्रयत्नांनी २० वर्षांपासून प्रलंबीत पाडळसे धरण पूर्ण होऊ शकते!” असे मा.मंत्री. आ.एकनाथराव खडसे यांनी पाडळसे जनआंदोलन संघर्ष समितीच्या आंदोलनास दुरध्वनीने संबोधित करीत साखळी उपोषण आंदोलनास पाठींबा जाहिर केला.आजच्या आंदोलनात धुळे येथी आजी माजी लोकप्रतिनिधीनी प्रत्यक्ष उपस्थिती व पाठिंबापत्र देत सक्रिय सहभाग नोंदविल्याने आंदोलनाची व्याप्ती आता जळगांव व धुळे जिल्ह्यापर्यंत वाढली आहे.
धुळे येथिल आ.कुणाल पाटिल तसेच मा.मंत्री रोहिदास पाटिल यांनी जनआंदोलन समिती तर्फे शेतकरी व जनतेच्या पाण्याच्या उभारण्यात आलेल्या आंदोलनास पाठींबा असल्याचे पत्र धुळे जि. प.सदस्य के.डी. पाटिल व सहकारी यांनी दिले. मा.आ.प्रा.शरद पाटिल यांनी पाडळसे आंदोलनात धुळे तालुक्यातील जनता घेऊन रस्त्यावर उतरू! असे आश्वासन दिले.धुळे येथील एन.के. पवार, मनोहर शिसोदे,सातरने मा.सरपंच गुलाबराव शिसोदे,प्रदीप पाटिल, श्याम जाधव तसेच धुळे मा.नगरसेवक गुलाब माळी,पत्रकार दिपक वाघ यांच्यासह सेना अध्यक्ष विजय पाटिल आजच्या आंदोलनास पाठिंबा दिला.
जनआंदोलन समितीचे सुभाष चौधरी, शिवाजीराव पाटिल यांनी, साखळी उपोषणाच्या ७ व्या दिवसापर्यंत शासनाने आंदोलनाची दखल न घेतल्याने शासनाचा शेतकऱ्यांच्या प्रति असलेल्या नाकर्तेपणाचा जाहीर धिक्कार नोंदविला.
मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटिल यांनीही धरणास प्राप्त निधींबाबत विश्लेषण केले.
आंदोलनास आजही मोठ्या प्रमाणावर नागरिकांचा प्रतिसाद वाढता होता.चोपडा येथिल एकता फाउंडेशन, अमळनेर उपसा सिंचन योजना संघर्ष समिती, तसेच आ.शिरीष दादा मित्र परिवाराचे पंकज चौधरी, बाळासाहेब संदानशिव, व कार्यकर्ते हि सहभागी झालेत.अथर्व बंगलोज मुंदडा नगर येथील महिलां मंडळ,संत सखाराम महाराज रिक्षा युनियन यांनी सुद्धा पाठिंब्याचे पत्र यावेळी नगरसेवक मनोज बापू पाटील, निशांत अग्रवाल, रा.काँचे ता. अध्यक्ष सचिन पाटील, रवी पाटील, विक्रांत पाटील,अर्बन बँकेचे संचालक मंडळ,प्रवीण जैन,भरत ललवाणी , प्रवीण पाटील,वसुंधरा लांडगे मॅडम ,पंकज मुंदडा, अभिषेक पाटील, प्रदीप अग्रवाल,शांताराम ठाकुर तसेच मेजर राजेंद्र यादव,जयवंत शिसोदे या सर्वानी उपोषणात सहभागी होऊन पाठिंबा दिला.माजी सैनिक संघाचे सुभेदार मेजर बळीराम वानखडे, अध्यक्ष माजी सैनिक संघटना अमळनेर, सुभेदार मेजर दुर्योधन पाटील उपाध्यक्ष, हवालदार राजेंद्र जगताप, नाईक नितीन बोरसे, नाईक राजेंद्र यादव व इतर माजी सैनिक उपस्थित होते ,समृद्ध माती फाउंडेशन तर्फे विजय पाटील,सौ.वसुंधरा लांडगे, प्रतिभा पाटिल,प्रा.ज्ञानेश्वर पाटिल (मुडी), सुपडू बैसाणे तसेच अमळनेर सुभाष चौक रिक्षा युनियनचे अध्यक्ष किशोर पाटिल,नंदू पाटिल,सचिन पाटिल आदिंसह सर्व रिक्षा युनियन चे पदाधिकारी व रिक्षा चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.पोलीस पाटिल संघटनेचे अध्यक्ष सबगव्हान भाऊसाहेब पाटिल, इदापिंप्री भानुदास पाटिल, आदिंसह मालपूर, धार पोलिस पाटील यांनीही पदाधिकारी यांचेसह पाठिंबा दिला.तर सानेगुरुजी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.डी. देशमुख यांनी सर्व शिक्षकांसह पाठींबा जाहीर केला.
ग्रामिण महिलांचा उत्स्फूर्त पाठिंबा
महिला पोलिस पाटील सौ.कविता पाटिल टाकरखेडे, अंतुर्ली येथील महिला ग्रा.प.सदस्या सौ.वैशाली पाटिल,सौ.मंगल पाटिल,सौ.प्रतिभा पाटिल,सौ.वर्षा पाटिल,सौ.जना बाई पाटिल,सौ.मंगला पाटिल,सौ.रत्न पाटील,रंजाणे येथिल सौ.कल्पना पाटिल आदि उपोषणास पाठिंबा देत सहभागी झाल्यात. तर कृ.उ.बा. संचालक सुरेश पिरण पाटिल, पाडळसे येथिल अनिल शिसोदे (डांगरी), पाडळसे भागवत पाटिल, वसंत पाटिल,प्रा. मनोहर बडगुजर, प्रा.बी.एन.पाटिल(राहुरी), धरणगाव चे अ. नि.स.अध्यक्ष प्रा.आर.एन.भदाणे, लोणपंचम चे डॉ.रामू पाटिल, श्री.विलास पवार, पद्माकर वंजारी, भगतसिंग परदेशी,पिंगळवाडे उपसरपंच सुभाष पाटिल,याआदिंसह मोठ्या संख्येने उपस्थित होते.