अमळनेर ( प्रतिनिधि ) अमळनेर आमच्या भारत देशात कायम अमन व शांती रहावे अशी विशेष दुवा ( प्रार्थना ) हजारोंच्या संख्येने उपस्थित भाविकांच्या दरम्यान सुन्नी दावते इस्लामीचे अंतरराष्ट्रीय प्रमुख मौलना अल हाज शाकिर अली नुरी यांनी प्रार्थना केली
शहरातील जापान जीनला लागुन आठ ते दहा एकर जागेत हजारोंच्या संख्येने भाविकांच्या उपस्थितीत दोन दिवसीय सुन्नी इज्तेमा संपन्न झाले
इज्तेमा साठी प्रवचनाला मुख्य मौलना शाकिर अली नुरी यांनी सलग दिड ते दोन तास आपले प्रवचन केले कुराणात जे संदेश दिले आहे त्याचे प्रमाणे प्रत्येक मुसलमानांनी जीवन जगावे नमाज हज जकात कायम करावे आपण कोणत्याही चांगले व सत्य काम करताना अनेक अडचणी येतात परंतु निश्चित याचे फळ मिळते विशेष म्हणजे आपल्या आई बहिन सह प्रत्येक महिलांचा आदर करावे आणि कुराणचा माणूस बना व जीना ( अवैध संबंध ) पासुन बचा असे संदेश हजारोंच्या संख्येने उपस्थित भाविकांना दिला २४ फरवरी रोजी पुरुषांसाठी सकाळी दहा ते रात्री दहा पर्यंत होते महाराष्ट्र गुजरात मध्यप्रदेश सह आदि ठिकाणाहून मौलना कारी आलीम हाफिज व सुन्नी दावते इस्लामी चे मुबलीक प्रवचना साठी उपस्थित होते भिवंडीचे मौलना रोहेफ रजा यांनी प्रश्न उत्तर प्रिन्सिपल रिजवान कारी यांनी नातेपाक द्वारे भाविकांचे मन जिंकली तर मालेगांवचे अमिनुल कादरी यांनीही नमाजे संदेश दिले .
सुन्नी दावते इस्लामी शाखा अमळनेर च्या वतीने आयोजित सुन्नी इज्तेमात दिवसभरात तालुक्याचे आमदार शिरीष दादा चौधरी भाजपाचे जिलाध्यक्ष उदय वाघ माजी पालक मंत्री गुलाबराव देवकर जिल्हा बँकेचे संचालक अनिल भाईदास पाटील माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील डाँ बी एस पाटील दलित नेते रामभाऊ संदानशिव नगरसेवक मनोज पाटील नरेंद्र संदानशिव बबली पाठक पंकज चौधरी प्रताप शिंपी व पत्रकार सह आदि बांधवानी हाजरी लावली प्रभाग क्रमांक ४ चे नगरसेविका माया बाई लोहरे व सामाजिक कार्यकर्ते संतोष लोहरे यांनी इज्तेमासाठी दोन दिवसीय रुग्णवाहिकाची मोफत व्यवस्था केली होती इज्तेमाच्या शेवटी अमिनुल कादरी यांनी नगरपरिषद पोलीस प्रशासन व सामाजिक संस्था नगरसेवक आणि सर्व परिश्रम घेतलेल्यांचा आभार व्यक्त केले