अमळनेर (प्रतिनिधी) धर्मवीर अध्यात्मिक शिवसेनातर्फे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुन्हा राज्य यावे यासाठी अमळनेरच्या मंगळ ग्रह मंदिरात त्यांच्या वाढदिवशी अभिषेक करण्यात आला.
धर्मवीर अध्यात्मिक शिवसेना प्रमुख अक्षय महाराज भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या अभिषेकात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हातून महाराष्ट्र राज्याच्या जनतेची अधिक सेवा व्हावी तसेच शिंदे सरकार पुन्हा यावे या उद्देशाने धर्मवीर अध्यात्मिक सेना समन्वयक तथा मंगळ ग्रह सेवा संस्थेचे सहसचिव दिलीप बहिरम यांच्या हस्ते मंगळ ग्रह मंदिरात अभिषेक करण्यात आला. यावेळी खजिनदार गिरीश कुलकर्णी, मंगल सेवेकरी हेमंतभाई गुजराती, भाविक तसेच शिंदे सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, विश्वस्त मंडळ आणि शिंदे गट, शिवसेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.