अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील सार्वजनिक विद्यालय सारबेटे हायस्कूल येथे १७ वर्षानंतर दहावीच्या बॅचच्या मित्र मैत्रिणींनी एकत्र येत आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
यां शाळेतील सन २००८-२००९ सालच्या दहावीच्या बॅचचा स्नेहमेळावा नुकताच झाला. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने झाली. कार्यक्रमाला प्रमुख अध्यक्ष म्हणून शाळेचे चेअरमन राजेश पाटील उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून आर. के. सूर्यवंशी, एस. डी. पवार उपस्थित होते. तसेच शाळेचे मुख्याध्यापक जे. डी. अहिरे, साळुंखे, पूजा, सुनंदा, रूपाली आदी मॅडमसह पवार भाऊसाहेब, सुभाष तात्या आदी मान्यवर उपस्थित होते. व्यासपीठावर उपस्थित सर्व गुरुजनांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सूर्यवंशी व पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. गेल्या सतरा वर्षानंतर भेटल्याने मित्र मैत्रिणींना आपला थोडक्यात परिचय दिला. तसेच सर्व माजी विद्यार्थ्यांनी शाळेला महापुरुषांच्या प्रतिमा भेट दिल्या. यावेळी माजी विद्यार्थी ऋषिकेश पाटील, महेंद्र पाटील, ज्ञानेश्वर पाटील, विलास पाटील, गणेश पाटील, आशिष पाटील, पवन पाटील, मनोहर पाटील, अमृत पाटील, तुषार पाटील, भूमिका पाटील, जागृती पाटील, माधुरी पाटील, पूनम पाटील, स्वाती पाटील, संगीता पाटील, कविता पाटील, मोनाली पाटील, वैशाली पाटील आदी माजी विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋषिकेश पाटील यांनी केले. तर आभार विलास पाटील यांनी मानले. उपस्थित सर्वांनी स्नेह भोजनाचा आस्वाद घेऊन आपल्या मित्र-मैत्रिणी सोबत फोटो काढत एकत्र आल्याचा आनंद घेतला. सर्वांनी कायम सोबत राहण्याचे वचन देत एकमेकांचा निरोप घेतला.