अमळनेर (प्रतिनिधी) अपघातात गंभीर जखमी झालेले नगरपरिषदेचे वरिष्ठ लिपिक विजय अभिमन पाटील यांनी मृत्यूशी झुंज देत 8 रोजी अखेरचा श्वास घेतला.याबाबत अधिक माहिती अशी की, वरिष्ठ लिपिक विजय अभिमन पाटील (रा.पारगाव, ह. मु. देशमुख बंगला जवळ,अमळनेर) यांचा दोन दिवसांपूर्वी अपघात झाला होता. यानंतर रुग्णालयात मृत्यूशी ते झुंज देत होते, मात्र दुर्देवाने मेंदूला मोठा मार असल्याने काल सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. पालिकेतून तीन महिन्यात ते निवृत्त होणार होते. त्यापूर्वीच काळाने घात केल्याने अनेकांनी दुःख व्यक्त केले.अत्यंत शांत व सुस्वभावी व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती, या घटनेने त्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला असून सर्वत्र दुःख व्यक्त होत आहे. अमळनेर ग्रामिण रुग्णालयात त्यांचे शवविच्छेदन झाल्यानंतर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा सून व नातवंडे असा परिवार असून चेतन उर्फ विक्की विजय पाटील यांचे ते वडील तर सामाजिक कार्यकर्ते कैलास नामदेव पाटील व पालिका कर्मचारी बंडु पाटील यांचे ते मेहुणे होत.