अमळनेर (प्रतिनिधी) मराठा समाज महिला मंडळाचा हळदी कुंकू कार्यक्रम व स्नेह मेळावा उत्साहात झाला.अमळनेर तालुका मराठा समाज महिला मंडळाचा ९ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ वंदनेने झाली. त्यानंतर अध्यक्ष खजिनदार पद्मजा पाटील यांनी मागील वर्षाचा हिशोब सादर केला. अहवाल वाचन केले. महिलांचे विविध खेळ व स्पर्धा घेण्यात आल्या. २०१६ जानेवारीत मकरसंक्रांत हळदीकूंकुच्या कार्यक्रमापासुन या मंडळाची सुरूवात झाली. अध्यक्षा तिलोत्तमाताई पाटील यांच्या संकल्पनांतुन या मंडळाची सुरूवात झाली. त्यांना जयश्रीताई अनिल पाटील, सुलोचनाचाई वाघ, सौ. सुनिताताई पाटील, अलकाताई पाटील, मंगलाताई पाटील, भारती पाटील (आधार संस्था), शिलाताई पाटील, कमलआक्का पाटील, प्रभाताई पवार, माधुरीताई पाटील, मनिषाताई पाटील, रागिणीताई पाटील, पद्मजाताई पाटील, भारती पाटील (भैरव), लीना पाटील या सर्वांची साथ लाभली. तिलोत्तमाताई पाटील यांनी प्रास्ताविक केले. लीनाताई पाटील यांनी सूत्रसंचालन केले.