सप्तरंगीय इंद्रधनुष्य रंग उधळीत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

अमळनेर (प्रतिनिधी) पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सप्तरंगीय इंद्रधनुष्य रंग उधळीत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात झाले.

कार्यक्रमाची सुरुवात सायंकाळच्या शांत व नयनरम्य प्रसंगी मान्यवरांच्या उपस्थितीत  करण्यात आली. कार्यक्रमासाठी  खा.शि. मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र झावक, कार्याध्यक्षस्थानी डॉ. संदेश  गुजराथी प्रमुख अतिथी होते. माजी विद्यार्थी डॉ. प्रीतम जैन त्यांच्या सुविदय पत्नी डॉ. दिशा जैन, पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलचे चेअरमन प्रदीप के. अग्रवाल, कार्याध्यक्ष नीरज अग्रवाल,  खा. शि. मंडळाचे संचालक हरी भिका वाणी, विश्वस्त , वसुंधरा लांडगे, संस्थेचे सचिव विद्यमान प्राचार्य डॉ. ए.पी. जैन, कमल कोचर उपस्थित होते.  डॉ. प्रीतम जैन म्हणाले की सार्थ अभिमान मला या शाळेचा व गुरुजनांचा आहे. ज्या शाळेमध्ये मी घडलो. माझ्या जीवनाला आकार- उकार मिळाला. मी सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करून हे सर्वांसमोर नतमस्तक होऊन त्यांना वंदन करतो. अशा प्रकारचे भावनिक पण तेवढेच बोलके मार्गदर्शक स्वरूपात मनोगत व्यक्त करून सर्वांची मने जिंकली. त्यांच्या या मनोगतला प्रचंड टाळ्यांचा कडकडाट प्राप्त होऊन सर्व प्रेक्षक भावनिक झाले. त्यासोबत शाळेचे चेअरमन l प्रदीप के. अग्रवाल यांनी शाळेच्या वैभवशाली परंपरेचे कार्याचे तसेच शाळेने केलेले अतुलनीय कार्याची ओळख ही आपल्या मनोगत भाषणातून करून दिली. शैक्षणिक वर्ष 2023 24 मध्ये शाळेतून पहिली आलेले विद्यार्थिनी मानसी पाटील व अनुक्रमे क्रमवारीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याचे सत्कार मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह रोख बक्षीस देऊन करण्यात आले.

कार्यक्रमासाठी अनमोल मार्गदर्शन सर्वतोपरी सहाय्य शाळेचे चेअरमन से प्रदीप जी अग्रवाल, मुख्याध्यापक जे. एस. देवरे, पर्यवेक्षक महेश माळी, पर्यवेक्षिका मीनाक्षी बारी, व्ही. पी. बडवे, व्ही.एस. अमृतकर, व्ही.जी. बोरोले, प्रशांत वंजारी, अनंत बागल, सुवर्णा बोहरे, प्रतिमा ठाकूर, श्वेता पवार, आयेशा खान, स्वप्ना विसपुते, स्वाती माळी, योगिषा महाजन समस्त शिक्षक वृंदवर्ग व शिक्षक केंद्र कर्मचारी वृंदावर्ग यांचे लाभले.

 

सांस्कृतिक नृत्याचा कार्यक्रम

 

सांस्कृतिक नृत्याचा संगीताचा लोकनृत्याची रंगारंग कार्यक्रमाची सुरुवात ही करण्यात आली.      इयत्ता नर्सरी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी उपरोक्त बहुआयामी कलागुणांना सुप्त गुणांना एक मंच उपलब्ध करून देणाऱ्या कार्यक्रमास सुरुवात करून दिली. सदर प्रेक्षक रुद्र व पालक रुंद यांना अनोखी मेजवानी देणारा  हा सांस्कृतिक कार्यक्रम का ठरत असतो. सर्वांचे मनोरंजनासोबत प्रबोधन सुद्धा विद्यार्थी आपल्या कलाकृतीतून करीत असतात. या नृत्य कार्यक्रमांमध्ये जुने गीत वरील नृत्य लोककला भारूड, गोंधळ, लावणी तसेच नाना विविध कार्यक्रम सादर केले.

 

चित्रकला, आर्ट गॅलरीचे आयोजन

 

 त्याचसोबत विद्यार्थ्यांच्या अंगातील कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांना एक सशक्त कलाकार बनवण्यासाठी चित्रकला, आर्ट गॅलरी, बिस्कीट डेकोरेशन व फुल डेकोरेशन रांगोळी कलाकृती अशा विविध वैविध्यपूर्ण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

 

शेलापागोटा कार्यक्रम रंगला

 

दुसऱ्या दिवसीय कार्यक्रमात सकाळ सत्रात ‘शेलापागोटा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यात नानाविध शेलापागोटा द्वारे एक लेखन मनोरंजनात्मक चारोळ्या कविता त्या सादर करण्यात आल्या. व विद्यार्थ्यांना त्यांच्या मनातील गोष्टी बाबींना याद्वारे भावना प्रकट करण्याचे एक माध्यम प्राप्त करून देण्यात आले. संध्याकाळच्या सदरात शाळेचे मुख्याध्यापक जे. एस. देवरे यांनी वार्षिक अहवाल वाचन केले. त्यासोबत शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये ‘डॉ. होमी भाभा टॅलेंट सर्च’ परीक्षेतून समस्त महाराष्ट्रातून वित्तीय क्रमांक प्राप्त केलेल्या शिष्यवृत्ती प्राप्त तसेच अंतराळ संस्था इस्रो भेटीसाठी निवड झालेल्या मोहित देवरे याचे मान्यवरांचे हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *