लोखंडी आसारीने मारल्यामुळे माजी कर्मचारी गंभीर दुखापत
अमळनेर (प्रतिनिधी) पतपेढीची अनामत रक्कम मागितल्याच्या कारणावरून पू.सानेगुरुजी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतपेढीचा अध्यक्ष त्याची पत्नी व मुलाने एकाला लोखंडी आसारीने मारल्याची घटना १२ रोजी सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास धुळे रोडवर घडली
पू.सानेगुरुजी पतपेढीचे अध्यक्ष राजेंद्र भगवंतराव पवार यांच्या विद्याविहार कॉलनीतील घरी १० फेब्रुवारी रोजी साने गुरुजी पतपेढीचा माजी कर्मचारी दीपक रामकृष्ण पाटील हा पतपेढी मधील अनामत रक्कम मागण्यासाठी गेला होता त्याचा राग येऊन १२ रोजी अध्यक्ष राजेंद्र पवार , त्यांची पत्नी ज्योती राजेंद्र पवार आणि मुलगा मोहित पवार पांढऱ्या वाहनातून धुळे रस्त्यावर दीपक फर्निचरचा व्यवसाय करीत असलेल्या उघड्यावरील दुकानासमोर गेले व तू अनामत रक्कम मागायला का आला होता म्हणून जाब विचारू लागले असता दीपक ने त्यांना मला व्यवसायासाठी पैसे लागणार आहेत म्हणून सांगितले त्यावेळी त्याचे वडील रामकृष्ण पाटील हजर होते लागलीच पवार कुटुंबीयांनी त्याला लाथ बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ करणे सुरू केले आणि वाहनातील लोखंडी आसारी काढून डाव्या कानावर आणि उजव्या हातावर मारल्यामुळे उजव्या हाताचं बोटाना गंभीर दुखापत झाली तसेच अनामत रक्कम मागितली तर दिपक वर खोटा विनयभंग व इतर गुन्हे दाखल करण्याची धमकी ज्योती पवार यांनी दिली दिपकने वैद्यकीय तपासणी करून दाखला दिल्यानंतर अमळनेर पोलीस स्टेशनला राजेंद्र पवार , मोहित पवार व ज्योती पवार यांच्या विरुद्ध भादवी ३२६ , ३२४, ३२३ , २९४ , ५०४ , ५०६ व ३४ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सहाययक पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर पाटील हे करीत आहेत.