अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मारवड येथील न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय, सु. हि. मुंदडे हायस्कूल व श्रीमती द्रौ. फ. साळुंखे कनिष्ठ महाविद्यालय, न्यू इंग्लिश स्कूल, प्र. डांगरी आणि विनायकराव यादवराव पाटील माध्यमिक विद्यालय, करणखेडा यांचे संयुक्त विद्यमाने वार्षिक स्नेहसंमेलन दि. ७ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता करण्यात आले आहे. यात पालकमंत्री गुलाबराव पाटील,आमदार अनिल पाटील व खा.स्मिताताई वाघ यांचा सत्कार सोहळा होणार आहे.
ग्राम विकास शिक्षण मंडळाचे शैक्षणिक संकुल, मारवड येथे हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्रीपदी विराजमान झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, अमळनेर विधानसभेचे आमदार झाल्याबद्दल माजी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील, तर जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार झाल्याबद्दल स्मिताताई उदय वाघ यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. स्नेह संमेलनाचे उद्घाटन मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार अनिल पाटील असतील. गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा सत्कार माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी जळगावचे माजी महापौर विष्णू भंगाळे, धरणगावचे माजी पंस सभापती प्रेमराज पाटील, माजी जिप सदस्या प्रभावती जयवंतराव पाटील, माजी जिप सदस्या जयश्री अनिल पाटील, दूध संघाच्या संचालिका भैरवी वाघ पलांडे, खानदेश शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. अनिल शिंदे, माजी जिप सदस्य शांताराम पाटील, मिनाबाई रमेश पाटील, माजी जिल्हा बँक संचालिका तिलोत्तमा पाटील, अमळनेर वकील संघाचे अध्यक्ष ॲड. किरण पाटील, बाजार समितीचे सभापती अशोकराव पाटील, बाजार समितीचे उपसभापती सुरेश पिरण पाटील, मुंदडा फाऊंडेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश मुंदडा, पंसचे माजी उपसभापती बाळासाहेब पाटील, सरपंच परिषदेच्या विभागीय अध्यक्षा सुषमाताई देसले, शेतकी संघाचे माजी प्रेसिडेंट अनिल शिसोदे, फ्रुटसेल सोसायटी चेअरमन भागवत पाटील, मारवड सरपंच आशाबाई भिल, न्यू व्हिजन इंग्लिश स्कुलचे अध्यक्ष शितल देशमुख, मारवड विकासो चे चेअरमन शरदराव पाटील यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लाभणार आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला असून यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रामविकास शिक्षण मंडळाचे अध्यक्ष तथा शैक्षणिक संस्थाचालक संघटनेचे अध्यक्ष जयवंतराव मंसाराम पाटील, उपाध्यक्ष देविदास शामराव पाटील, सचिव देविदास बारकू पाटील तसेच सर्व संचालक मंडळ व व्यवस्थापन समिती सदस्य तसेच मारवड हायस्कुलचे प्राचार्य लक्ष्मीकांत सैदाने, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंतराव देसले, करणखेडा हायस्कुल चे मुख्याध्यापक नंदकिशोर पवार, प्र. डांगरी हायस्कूलचे मुख्याध्यापक राकेश पवार यांनी केले आहे.