अमळनेर (प्रतिनिधी) धरणागाव तालुक्यातील नांदेड फाटा येथे दिनांक १५ डिसेंबर २०२४ रोजी रात्री रस्त्यामध्ये अडवून लुट केल्याप्रकरणातील आरोपींच्या एलसीबीने मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, एक जणाची मोटारसायकल, मोबाईल व रोख रक्कम जबरदस्तीने काढुन घेतली म्हणून धरणगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला होता. त्यानुसार गुन्ह्यातील आरोपीताचा शोध घेवुन गुन्हा उघडकिस आणणेबाबत वरीष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी आदेशीत करुन पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, पोहवा नंदलाल पाटील, संदिप पाटील, प्रविण मांडोळे, पोना भगवान पाटील, पोकॉ राहुल कोळी व चालक पोहवा दिपक चौधरी यांचे पथक तयार करण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार या गुन्हयातील आरोपी हा तामसवाडी (ता. पारोळा) येथील असल्याबाबत माहीती मिळाल्याने पथकाने छापा टाकुन त्यास मुद्देमालासह ताब्यात घेतले. त्याने त्याचे नाव अक्षय ऊर्फ घोडा भिमराव पाटील (बागुल, रा. तामसवाडी ता. पारोळा जि. जळगाव) असे आहे. त्याचे साथीदार अभिजीत भरतसिंग राजपुत (ता. वणी मलाणे ता.जि.धुळे), अजय भाईदास थोरात (रा.नवलनगर ता.जि.धुळे) व संभाजी पाटील (रा. सातरणे ता.जि.धुळे) यांनी मिळून नांदेड फाटा, ता. धरणगाव येथे तोडांला रुमाल बांधुन एका इसमाकडील मोबाईल फोन, रोख रक्कम व मोटारसायकल जबरदस्तीने काढून घेवुन पळुन गेले होते. आरोपी अक्षय पाटील याचेकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेली हिरो कंपनीची एच एफ डिलक्स मोटारसायकल व रोख रक्कम असे मिळुन २०५२० रुपयाचा मुददेमाल हस्तगत करुन त्याला धरणगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उप विभागीय पोलीस अधिकारी आण्णसाहेब घोलप, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.