अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील जानवे येथील किसान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता 10 वीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला.
कार्यक्रम प्रसंगी जानवे येथील मूळ रहिवासी असलेले व शिमला येथील औषध निर्माण क्षेत्रातील एक यशस्वी उद्योजक डॉ.प्रमोदराव अर्जुन पाटील अध्यक्षस्थानी होते. तसेच शाळेचा जेष्ठ शिक्षिका के. एल.मनोरे यांनी प्रास्ताविक करून शाळेचा वर्षभरातील विद्यार्थ्यांमधील कलागुणांचा व अभ्यासाचा आलेख आपल्या भाषणातून मांडला व इयत्ता 10विचा विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून शाळेचा आठवणींना उजाळा देत असतांना अनेक विद्यार्थ्यांना गहिवरून आले. कार्यक्रमाचा यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक संदीप बोरसे, जेष्ठ शिक्षक पि. एस.पाटील,जेष्ठ लिपिक आनंदराव भाऊसाहेब, ए. यु. विसावे सर,देशमुख, साळुंखे, एस.एस. पाटील, दिपक माळी यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज माळी यांनी केले. आभार मुख्याध्यापक बोरसे यांनी मानले.