स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

 

: *🚨आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स – (प्रश्न & उत्तरे)*

 

🗓 *7 फेब्रुवारी 2025* 🗓

🔖*प्रश्न.1) १९ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आले आहे ?*

 

*उत्तर -* छत्रपती संभाजीनगर

 

🔖*प्रश्न.2) १९ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे ?*

 

*उत्तर -* अशोक राणा

 

🔖*प्रश्न.3) ३८ व्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या महिला संघाने कोणत्या क्रिडा प्रकारात सांघिक सुवर्ण पदक जिंकले आहे ?*

 

*उत्तर -* योगासन

 

🔖*प्रश्न.4) 6 वी पुरुष हॉकी इंडिया लीग स्पर्धा 2004-25 कोणत्या संघाने जिंकली ?*

 

*उत्तर -* श्राची रढ बंगाल टायगर्स

 

🔖*प्रश्न.5) 1 ली महिला हॉकी  इंडिया लीग स्पर्धा 2004-25 कोणत्या संघाने जिंकली ?*

 

*उत्तर -* ओडिशा वॉरियर्स

 

🔖*प्रश्न.6) नुकतेच कोणत्या राज्य सरकारने राज्यात समान नागरी कायदा लागु करण्यासाठी समिती स्थापन केली आहे ?*

 

*उत्तर -* गुजरात

 

🔖*प्रश्न.7) व्हाट्सअप्प द्वारे प्रशासन सेवा सुरू करणारे हे जगातील पहिले राज्य कोणते बनले आहे ?*

 

*उत्तर -* आंध्र प्रदेश

 

🔖*प्रश्न.8) Ekuverin २०२५ सैन्य अभ्यास कोणत्या दोन देशात आयोजित करण्यात आला आहे ?*

 

*उत्तर -* भारत आणि मालदीव

 

🔖*प्रश्न.9) तांदळाच्या किमती मध्ये वाढ झाल्यामुळे कोणत्या देशात अन्न सुरक्षा आणिबाणी लागु करण्यात आली आहे ?*

 

*उत्तर -* फिलिपाईन्स

 

🔖 *प्रश्न.10) संयुक्त राष्ट्र महासभा द्वारा दरवर्षी कोणत्या कालावधीत विश्व धर्मीय सौहाद्र सप्ताह साजरा करण्यात येतो ?*

 

*उत्तर -* १ ते ७ फेब्रुवारी

 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

 

: चालू घडामोडी 2025:

#MorningBooster

 

🤩 लतिका कट्ट यांचे निधन

◾️भारतीय शिल्पकार

◾️जन्म – 20 फेब्रुवारी 1948 संयुक्त प्रांत , भारत

◾️वयाच्या 76 व्या वर्षी निधन (जयपूर)

◾️कट्ट हे भारतातील सर्वात प्रतिभावान शिल्पकारांपैकी एक होत्या

◾️वाराणसी येथील दशॉमेठ घाट येथे मकर संक्रांती” या तिच्या कांस्य कामासाठी तिला बीजिंग आर्ट बिएनाले पुरस्कार मिळाला होता

◾️अनेक वर्षे त्यांनी जामिया मिलिया इस्लामिया आणि बनारस हिंदू विद्यापीठात अध्यापन केले

◾️1980 – राष्ट्रीय पुरस्कार, ललित कला अकादमी, नवी दिल्ली

◾️1973 -गुजरात राज्य ललित कला अकादमी, अहमदाबाद

◾️1974 – अखिल भारतीय ललित कला आणि हस्तकला सोसायटी, नवी दिल्ली

◾️1974 – ललित कला अकादमी, कलकत्ता

🤩 पहिल्या जागतिक पिकलबॉल लीगचे विजेते – बेंगळुरू जवान्स

◾️विजेता – बेंगळुरू जवान्स

◾️उपविजेता – पुणे युनायटेड

◾️3 -1 असा पराभव केला

🤩 आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सची अधिकृत स्थापना करण्यात आली

◾️इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स (IBCA) अधिकृतपणे एक करार-आधारित, आंतर-सरकारी संघटना म्हणून अस्तित्वात आली आहे

◾️मुख्यालय – भारत 🇮🇳

🤩IBCA चे संस्थापक सदस्य 5 देश

◾️निकाराग्वा

◾️इस्वातिनी

◾️भारत

◾️सोमालिया

◾️लायबेरिया

◾️आतापर्यंत, भारतासह 27 देशांनी IBCA मध्ये सामील होण्यास संमती दिली आहे

◾️9 एप्रिल 2023 – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रोजेक्ट टायगरच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात IBCA सुरुवात केली(बंदिपूर राष्ट्रीय उद्यानातून (कर्नाटक) येथून)

◾️29 फेब्रुवारी 2024 केंद्रीय मंत्रिमंडळाने IBCA स्थापनेला मंजुरी दिली

🤩 या उपक्रमाचा मुख्य उद्देश

◾️ वाघ, सिंह, बिबट्या, हिम बिबट्या, चित्ता, जग्वार आणि प्यूमा 🐆🐅🤩

◾️या सात प्रमुख मोठ्या मांजरींच्या प्रजातींचे संवर्धन करणे आहे.🤩

◾️29 फेब्रुवारी 2023 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत, सरकारने IBCA स्थापनेला अधिकृतपणे मान्यता दिली

🤩 आजच्या काही Oneliner

◾️जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी (JAXA) ने मिचिबिकी क्रमांक 6 उपग्रह वाहून नेणारे पाचवे H-3 रॉकेट यशस्वीरित्या प्रक्षेपित🚀 केले.

◾️चीनने बनवलेला कृत्रिम सूर्य 🌞 1000 सेंकंदापर्यत जळत रहाण्याचा विक्रम केला (एक्सपेरिमेंटल अॅडव्हान्स्ड सुपरकंडक्टिंग टोकामॅक (EAST) )

◾️चिनी अंतराळवीरांनी  🇨🇳 तियांगोंग अंतराळ स्थानकावरील चीनच्या शेन्झोउ-19 क्रूने “कृत्रिम प्रकाशसंश्लेषण” 🍀 तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रथमच ऑक्सिजन आणि रॉकेट इंधनासाठी घटक तयार केले आहेत.

◾️भारतीय रेल्वे 🚂 ने 2030 पर्यंत 3000 दशलक्ष टन (MT) मालवाहतूक करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे

◾️मध्यप्रदेशात भारतातील पहिले पांढऱ्या वाघांचे प्रजनन केंद्र मंजूर (गोविंदगड, रेवा जिल्हा, मध्यप्रदेश)

🤩 67 व्या ग्रॅमी पुरस्कार 2025 -भारतीय वंशाच्या अमेरिकन संगीतकार चंद्रिका टंडन यांना मिळाला

◾️अल्बम –  त्रिवेणी साठी पुरस्कार

◾️श्रेणी -‘बेस्ट न्यू एज अल्बम, अँबियंट किंवा चांट अल्बम श्रेणी’

◾️त्यांचा हा पहिला ग्रॅमी पुरस्कार

◾️त्रिवेणी अलब्म साठी – चंद्रिका टंडन, वूटर केलरमन आणि एरु मात्सुमोटो या तिघांना पुरस्कार मिळाला आहे

◾️यामधील वूटर केलरमन (द आफ्रिका) बासरीवादक यांना 3 वेळा ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे

◾️2011 मध्ये त्यांच्या सोल कॉल अल्बमसाठी ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.

◾️जन्म – चेन्नई

◾️शिक्षण – इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट – अहमदाबाद येथे

🎼 ग्रॅमी पुरस्कार 🎼

◾️सुरवात – 4 मे 1959

◾️संगीत क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार

◾️त्यांना मूळतः ग्रामोफोन पुरस्कार असे म्हटले जात होते

◾️नॅशनल अकादमी ऑफ रेकॉर्डिंग आर्ट्स अँड सायन्सेस , अमेरिका द्वारे दिला जातो

🎺 भारतातील ग्रॅमी पुरस्कार काही विजेते

◾️1968 पंडित रविशंकर, प्रख्यात भारतीय सितार कलाकार आणि संगीतकार, भारतातील पहिले ग्रॅमी पुरस्कार विजेते होते.

◾️रविशंकर – 5 ग्रॅमी पुरस्कार

◾️झाकीर हुसेन-  4 ग्रॅमी पुरस्कार

◾️रिकी केज – 3 ग्रॅमी पुरस्कार

◾️ए आर रेहमान – 2 ग्रॅमी पुरस्कार

——————————————-

✍️ संकलन :- खबरीलाल ©चालू घडामोडी 2025🔥

 

#MorningBooster

 

👨‍🦱 6 वी पुरुष हॉकी इंडिया लीग 🏑2004-25

◾️विजेता – श्राची रढ बंगाल टायगर्स (3 कोटी)

◾️उपविजेता –  हैदराबाद तुफान्स (2 कोटी)

◾️4-3 असा पराभव केला

◾️ठिकाण – बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियम – राऊरकेला (ओडीसा)

◾️एकूण 8 संघ होते

◾️दिनांक -28 डिसेंबर 2024 ते 1 फेब्रुवारी 2025 पर्यत

👱‍♀️ 1 ली महिला हॉकी 🏑 इंडिया लीग 2004-25

◾️विजेता – ओडिशा वॉरियर्स

◾️उपविजेता –  सूरमा हॉकी क्लबचा

◾️2-1 असा पराभव केला

◾️ठिकाण – मरंग गोमके जयपाल सिंग मुंडा अ‍ॅस्ट्रो टर्फ हॉकी स्टेडियम , रांची झारखंड

◾️एकूण 4 संघ होत

◾️दिनांक -12 जानेवारी ते 26 जानेवारी 2025 पर्यत

🤩 आजच्या काही Oneliner

◾️मुंबई महापालिकेचा ने मांडला 74 हजार 427 कोटींचा अर्थसंकल्प🔖

◾️नायजर, माली आणि बुर्किना फासो यांनी अधिकृतपणे ECOWAS सोडले (ECOWAS हा पश्चिम आफ्रिकन राज्यांच्या आर्थिक समुदाय आहे)

◾️ECOWAS – Economic Community of West African States

◾️इराणने दोन नवीन क्षेपणास्त्रे बनवली आहेत: एतेमाद(1700Km-Ballistic)🚀आणि गदर-380(1000Km-anti warship)🚀

🤩 अल्जेरीया सध्या चर्चेत आहेत

◾️अल्जेरियन लष्कराचे प्रमुख आणि राष्ट्रीय संरक्षण मंत्री प्रतिनिधी जनरल सैद चानेग्रिहा 06 ते 12 फेब्रुवारी दरम्यान भारताच्या अधिकृत दौऱ्यावर येणार आहेत

◾️हा उत्तर आफ्रिकेतील मगरेब प्रदेशातील एक देश आहे

◾️राजधानी – अल्जियर्स

◾️अधिकृत भाषा – अरबी बर्बर

◾️धर्म – सुन्नी इस्लाम (99%)

◾️अध्यक्ष – अब्देलमदजिद तेब्बून

◾️पंतप्रधान – नादिर लारबाओई

◾️लोकसंख्या – 46700000

🤩 व्हाट्सअप्प द्वारे प्रशासन सेवा सुरू करणारे आंध्र प्रदेश हे जगातील पहिले राज्य बनले आहे

◾️नाव – मन मित्र 📱

◾️मन मित्र’ हा भारतातील पहिला Whatsapp आधारित प्रशासन प्लॅटफॉर्म सुरू केला आहे

◾️एकूण 161 प्रशासकीय सेवा दिल्या जातील

◾️सुरवात – 1 फेब्रुवारी 2025 (उंडवल्ली, अमरावती येथे)

◾️उदघाटन – नारा लोकेश (इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन आणि रिअल-टाइम गव्हर्नन्स (आरटीजी) मंत्री

◾️यासाठी 22 ऑक्टोबर 2024 रोजी दिल्लीत META सोबत सामंजस्य करार झाला होता

🤩 अमेरिकेत बेकायदा वास्तव्यास असलेल्या भारतीयांची अमेरिकेने परत भारतात पाठवले

◾️पहिल्या फेरीत – 104 भारतीयांना परत पाठवण्यात आले 🇮🇳

◾️5 फेब्रुवारी ला अमृतसर विमानतळावर हे विमान प्रवासी घेऊन उतरले

◾️अमेरिकन लष्कराचे C17 विमानाने 🛬 परत आले

◾️भारत हा 5 वा देश बनला आहे

◾️ग्वाटेमाला, होन्डुरास, इक्वाडोर आणि पेरू या देशांच्या नंतर अमेरिकने भारतीय लोकांना परत पाठवले आहे

◾️अमेरिकेने अश्या सुमारे 18 हजार बेकायदेशीर राहिलेल्या भारतीयांची यादी आहे सांगितले

◾️यापूर्वी नोव्हेंबर 2023 ते ऑक्टोबर 2024 दरम्यान 519 भारतीय नागरिकांना भारतात परत पाठवण्यात आले होते

🤩 नुकतेच निधन झालेल्या काही महत्वाच्या व्यक्ती

◾️आगा खान चौथे -इस्माइली मुस्लिमांचे आध्यात्मिक नेते

◾️वेंकटरामन – आकाशवाणीचे ज्येष्ठ वृत्त वाचक (पहिले तामिळ आवाज )

◾️डॉ. चेरियन – प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ

◾️नरेंद्र चपळगावकर – ज्येष्ठ लेखक आणि निवृत्त न्यायाधीश

◾️पी जयचंद्रन – ज्येष्ठ पार्श्वगायक

◾️प्रीतिश नंदी – पत्रकार , लेखक , माजी राज्यसभा खासदार

◾️के. एस. मणिलाल – प्रसिद्ध वनस्पती शास्त्रज्ञ

◾️लतिका कट्ट – प्रसिद्ध शिल्पकार

◾️ब्रायन मर्फी – ज्येष्ठ अभिनेते

◾️हॉर्स्ट कोहलर – माजी जर्मनीचे राष्ट्राध्यक्ष आणि IMF प्रमुख

◾️नवीन चावला – माजी मुख्य निवडणूक आयुक्त(2009 लोकसभा)

➖➖➖➖➖

✍️ संकलन :-खबरीलाल ©चालू घडामोडी 2025 👑

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *