आमदार चौधरींच्या माध्यमातून तब्बल 1 कोटींची विकास कामे झाल्याने ग्रामस्थानी केले कौतुक

अमळनेर(प्रतिनिधी)तालुक्यातील मुडी बोदर्डे येथे आमदार शिरीष चौधरी यांच्या प्रयत्नातून अत्याधुनिक ग्रामपंचायत इमारत, समाजिक सभागृह व सरक्षण भिंत कामाचे लोकार्पण तसेच नविन रस्ता कॉंक्रीटीकरणाचे भूमिपूजन आमदार शिरीष चौधरी व हिरा उद्योग समूहाचे चेअरमन डॉ रविंद्र चौधरी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी बोदर्डे सरपंच संतोष चौधरीं व ग्रामस्थांची विशेष उपस्थिती होती.बोदर्डे ग्रामस्थाची बऱ्याच दिवसांपासून ग्रामपंचायत इमारत व सामाजिक सभागृहाची तसेच विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आ चौधरींकडे केली होती या मागणीचा आदर करीत आमदार चौधरी यांच्या प्रयत्नातून सुमारे 1 कोटींची विकासकामे झाली आहेत,यापूर्वी देखील आमदार चौधरी यांच्या प्रयत्नातूनच ठक्कर बाप्पा योजनेत गावांत विविध विकास कामे तसेच बोदर्डे कळंबू रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून झाला आहे,आता ग्रामस्थांच्या मागणी नुसार लोणफाटा ते मुडी रस्त्याच्या कामाला मंजूरी मिळाली असून लवकरच सुरवात होणार आहे. तसेच बोदर्डे गावासाठी राष्ट्रीय पेयजल योजना ही मंजूर झाली असून लवकरच तिचे हि भूमिपूजन केले जाणार आहे .

अमळनेर मतदार संघात आमदार शिरीष चौधरी यांच्या माध्यमातून विकास कामे सुरु असून विरोधक भूलथापा देत आम्ही मंजूर केल्याचं आव आणत परस्पर भूमिपूजन करित आहे .पण जनता अशा भूल थापाना बळी पडणार नाही. आता पुन्हा शिरीष दादा चौधरीना आमदार करा असे प्रतिपादन डॉ रविंद्र चौधरी यांनी यावेळी केले .तालुक्यातील एक हि गाव असे नाही कि तिथे विकास कामे सुरु नाहीत .सार्वजनिक बांधकाम विभागातील एक इंच रस्ता सुद्धा शिल्लक नसून आदर्श मतदार संघ करायचा आहे तसेच गाव तिथे व्यायाम शाळा व गाव तिथे स्मारक बनविण्याचा मानस असल्याचे आमदार चौधरीनी सांगितले .यावेळी प्रस्तावित बोदर्डे प्रभारी सरपंच संतोष चौधरी यांनी केले व आमदार शिरीष चौधरी यांनी निधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करुन दिला त्याबद्दल आभार व्यक्त केले.सूत्रसंचालन तुषार सैंदाणे व संजीव पाटील यांनी केले या लोकार्पण व भूमिपूजन प्रसंगी विकासो व्हाईस चेअरमन बाळासाहेब सदांनशिव, जि प सदस्या संगिता भील, गटनेते प्रवीण पाठक, किरण गोसावी, नगरसेवक धनंजय महाजन, अबू महाजन, पंकज चौधरी, सुनील भामरे, राजेंद्र पाटील,रमेश पाटील, रामचंद्र पाटील, बोदर्डे सरपंच संतोष चौधरी, मुडी सरपंच काशिनाथ माळी, आनंदसिंग पाटील,पितांबर पाटील, मुगसिंग भील, शशांक सदांशीव, विलास भील, बापु मूलचंद भील, शामराव भील,चंद्रसेन पाटील, संजीव पाटील, नारायण पाटील, शांतीलाल पाटील, संजय युवराज पाटील, आकाबाई भील, नाना चौधरी, नाना भील, संजय भील , प्रवीण सदांनशिव, बापु बडगुजर, चंद्रकांत सनदाशिव , गुलाबराव चौधरी, प्रफुल्ल चौधरी, विलास सूर्यवंशी, हिरालाल चौधरी, अविनाश पाटील, भरत पाटील, सुरेश पाटील, नागराज चौधरी, राजू कुंभार, भगवान पाटील, क्रुष्णा पाटील, हिरामण पाटील, दिपक बोरसे, दगडू पाटील, चंद्रसेन पाटील, विलास भील, नंदकिशोर पाटील, निबा पाटील,दिनेश पाटील,छोटू सोनवणे, दौलत बोरसे, निखिल सोनवणे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
