नंदगाव येथे मोरी बांधकामासह रस्त्यासाठी ८ लाखांचा अतिरिक्त निधी
अमळनेर-(प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यातील कळमसरे-जळोद जि प गटात जि.प.च्या 3054/2132 अंतर्गत नंदगाव ते गांधली रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी 10 लक्ष 17 हजार 572 रु निधी मंजूर झाला आहे,याव्यतिरिक्त 5054/413 अंतर्गत नंदगाव येथे मोरी बांधकामासह डांबरीकरण व मजबुती करणासाठी 8 लक्ष 44 हजर 235 रु निधी मंजूर होऊन प्राप्त झाला असल्याची माहिती या गटाच्या जि प सदस्या सौ जयश्री अनिल पाटील यांनी दिली.
नंदगाव गांधली रस्त्याची मोठी दुरावस्था झाल्याने या रस्त्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सुरु होती,अखेर जि प सदस्या जयश्री पाटील यांनी या रस्त्याचे महत्व ओळखून मंजुरीसाठी जि प कडे जोमाने पाठपुरावा केला,यामुळे या कामास मंजुरी मिळाली असून सौ जयश्री पाटील यांचे विशेष आभार व्यक्त केले आहेत.दरम्यान सौ.जयश्री अनिल पाटील ह्या जि प तील विरोधी गटाच्या सदस्या असताना आपल्या गटात सर्वाधिक निधी त्यांनी खेचून आणून विकासात आपला नंबर अव्वल ठेवला आहे,यामुळे त्यांच्या कामाबाबत संपूर्ण गटात समाधान व्यक्त होत आहे.