भाजप मोदी सरकारच्या रामराज्यात….स्वःपक्षाच्याच लोकप्रतिनिधीचे कामदेव फेम छायाचित्र व्हायरल कांड.!

लोकसभेचा पत्ता कट करण्याचा डाव की सत्य…?

व्हायरल छायाचित्र चौकशी सुरू.!

( खबरीलाल) लोकप्रतिनिधी असूनही ज्याच्या अश्लिल कामक्रीडेचे छायाचित्रे सोशल मीडियातून सर्वत्र प्रसिद्ध झालेत त्या सुसंस्कृत भाजपच्या लोकप्रतिनिधीच्या नावाची उत्सुकता जळगांव लोकसभा मतदारसंघात शिघेला पोहचलेली आहे.
आपल्याच पक्षांतर्गत असलेल्या नाथ आणि भाऊंच्या छुप्या कथित गटबाजीतून लोकसभा निवडणुकीतील उमेदवारीच्या स्पर्धेतून ‘पत्ता साफ’ करण्याच्या उद्देशाने कि अजून इतर वैर काढण्याच्या हेतूने या कामक्रीडा दृश्यांचा व्हायरल कांडचा उदय झाल्याने राजकारणाच्या खालच्या पातळीवर ‘प्रकाश’ पडला आहे? या बाबत पक्ष व विरोधकांसह सामान्य लोकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. अश्यात डोक्यावर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणूकित विरोधकांच्या हाती मात्र आयते कोलीत लागले आहे.

निवडून खासदार ये ती।
आणि अश्लिल चाळे करती ।

वात्रटिकांसह आंबट चर्चा सुसंस्कृत पक्षाच्या लोकप्रतिनिधीबद्दल जळगांव लोकसभा मतदार संघात उठलेल्या कामक्रीडा छायाचित्र व्हायरल वादळाने पक्षांतर्गत तिकिटांची स्पर्धेची पातळी किती खालच्या थराला गेली आहे याची कल्पना न केलेली बरी!अशी दबक्या आवाजात कुजबुज विरोधी व पक्षिय पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये रंगलेली आहे.
दरम्यान आपल्या “खबरीलाल” ला या घटनेबाबत केलेल्या चौकशीत अतिशय मनोरंजक व तितकीच गंभीर माहितीही हाताशी लागलेली आहे.

लोक प्रतिनिधी धुंदीत की गुंगीत..?


जिल्ह्यातील अनेक वृत्तपत्रांनी प्रसिध्द केलेल्या अश्लिल चाळयांच्या मोघम वृत्तानंतर खबरीलाल च्या हाती छायाचित्रं लागताच संबंधितांना संपर्क केला व वास्तव जाणून घेण्याचाही प्रयत्न केला असता परंतु ते लोक प्रतिनिधी “नॉट रिचेबल” होते. व्हायरल छायाचित्रं पाहिल्यावर पहिला प्रश्न पडतो की संबंधित कथित लोकप्रतिनिधी हा कामक्रीडेत धुंदीत पडलेला की ‘गुंगीत झोपवलेला’ आहे ? असा प्रश्न निर्माण होतो.
यातील वास्तव जाणून घेतांना मिळालेल्या माहितीनुसार राजकारणाच्या पटलावर गेल्या काही महिन्यांपासून या प्रकाराची कुजबुज पक्षात व विरोधकांमध्येही राहून राहून सुरू होती. मात्र लोकसभा उमेदवारीत पत्ता जड होत असल्याचे लक्षात आल्याने पक्षांतर्गत स्पर्धकानेच तर हे षडयंत्र घडवले नाही ना? या चर्चेवर देखिल मोठा “प्रकाश” पडत आहे.
या व्हायरल कांडचे वृत्त गेल्या दोन दिवसापासून अनेक वृत्तपत्रातून प्रसिद्ध होत आहेत . प्रसारमाध्यमांना तो कथित लोकप्रतिनिधी कोण आहे हे माहीत असतांना देखील नाव जाहीर करण्याचे टाळून सेन्सॉर शिप चा भंग केला नाही, मात्र सोशल मीडियातुन मात्र त्या कथित लोकप्रतिनिधी च्या कामक्रीडेचे फोटो प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये पोहचले, आणि अजूनही फिरत आहेत..! वृत्तपत्र किती दिवस अशा वृत्ताना मोघम स्वरूपात प्रसिद्ध करतील.? या वृत्ताच्या सत्यात कधी उतरतील ? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.
तर भाजपच्या मोदीराज्यात अश्लिल कृत्यकरीत बिनदिक्कत आपलेच लोक प्रतिनिधी जर “नंगा”नाच करीत आहेत असे आरोप होत असतील तर पक्षिय पातळीवर याबाबत योग्य खुलासा होणे गरजेचे आहे.मात्र असा कोणताही खुलासा झालेला नसल्याने “नरोबा कुंजरोबा” ची भूमिका घेत नेते राजकिय मौन धारण करून एकप्रकारे कथित लोकप्रतिनिधीचे झालेले व्हायरल सत्य म्हणून स्वीकारत आहेत की संबंधितताची न बोलता बदनामी होऊ देत आहेत!
दाक्षिणात्य खलनायक सारखा चेहरा असलेला कथित लोकप्रतिनिधीचे कथीतपणे व्हायरल केलेले छायाचित्रे बोलके आहेत खबरीलाल ने आपणास या व्हायरल कांडाच्या पायरी पर्यंत आणून सोडलेले आहे. सत्य वृत्त व त्यामागचं राजकारण आपल्यापर्यंत पोहचवितांना कुणी ओढल्यास प्रसंगी कोर्टाची पायरीही चढायला आम्ही तयार आहोत !
जेंव्हा सर्व प्रिंट मीडिया तोंडावर बोट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया हाताची घडी घालत तेंव्हा फक्त खबरीलाल हे न्यूज पोर्टल खुलेआम पणे कोणाची ही तमा न बाळगता आपल्या सर्व वाचकांसाठी पडद्यामागील नाव किंवा सत्य घटना उघड करतो , आज देखील तो कथित लोकप्रतिनिधी कोण व घटनेमागचे राजकारण काय आहे हे मांडतांना खबरीलाल ने पक्का “क्लू” दिला आहे.
कामक्रीडा व्हायरल प्रकरण “पोलिटिकल गेम” आहे हे मात्र निश्चित म्हणता येईल इतका वाव यात दिसत असला तरीही आपल्या आंबट संवयीमुळे गोत्यात येणाऱ्यां राजकीय नेत्यांना एखाद्या तथाकथित कार्यकर्त्या महिलेला हाताशी धरून स्वविरोधक “कामक्रीडा” करतांनाचे चित्रीकरण करूनच पूर्वनियोजित “गेम” करतात, असेच काहीसे या प्रकरणात झाले आहे असे वाटते.
संबंधित लोकप्रतिनिधीचे एकूण ४० गाव सह आपल्या तालुक्यातील काही अधिकारी पदाधिकारी लोकांशी भूतकाळात खटके पडलेले होते त्यांनीच ‘भाऊ’गिरी सलगीतुन थकबाकी वसुलीचे जुने उट्टे काढत या प्रकरणावर ‘प्रकाश’ टाकत काढले असावे असे विविध तर्कवितर्क लावत राजकीय वर्तुळात लावले जात आहे !
गेल्या काही वर्षपासून ही एक परंपरा आहे.
भाजप खासदारांचा शेवट अशाच पद्धतीने होतो, चाळीसगाव रहिवाशी भाजपचे माजी खासदार याच मतदारांघाचे नेतृत्व केलेलं बेलगंगाचे माजी अध्यक्ष एम. के. यांनी देखील प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतले हे प्रकरण मीडियात आले आणि त्यांची खासदारकी गेली, पद्धत तीच मात्र यावेळी जरा नकोसा असलेला प्रकार मीडियात आणला गेला आणि लोकप्रतिनिधीचा चा बळी घेतला गेला, यापुढे येणाऱ्या नवीन पदाधिकाऱ्यांनी सावधानता बाळगावी, नाहीतर राजकीय सुडापोटी तुमचे राजकीय आणि सांसारिक जीवन एका क्लिक वर उद्ध्वस्त च समजा, असा इशारा यातून दिला गेला आहे हे मात्र निश्चित…

व्हायरल छायाचित्र चौकशी सुरू!

याबाबत संबधित छायाचित्रे खरी की बनविलेली खोटी आहेत याबाबत चौकशी सुरू झाली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. मात्र या प्रकरणामुळे जळगांव जिल्ह्याची व सुसंस्कृत पक्षाची झालेली बदनामी पाहता सदर छायाचित्रे सत्य असले तरी ते व्हायरल करणाऱ्यांचे ही मनसुबे व कटकारस्थान उघडे व्हायला हवेत व त्यांचे चेहरे जनतेसमोर यायला हवे अशी अपेक्षा नागरिकांना आहे. तर दुसरीकडे याबाबत खबरीलाल दक्ष पणे माहिती मिळवीत असून सत्य आपल्यासमोर आणून खोट्याला चव्हाट्यावर उघड-नागड करेल हे मात्र निश्चित .

सूचना – वाद विवाद अमळनेर जिल्हा जळगांव न्यायालय अंतर्गत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *