अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयाच्या आवारातून शिरसोली ता जळगाव येथील एक १७ वर्षीय मुलीला कुऱ्हाळदा ता जळगाव येथील तरुणाने फूस लावून पळवून नेल्याची घटना १६ रोजी दुपारी १ वाजता घडली
शिरसोली ता जळगाव येथील एक १७ वर्षीय मुलगी १२ रोजी दाजीबा नगर मधील आपल्या नातेवाईकांकडे आली होती १६ रोजी ती नातेवाईक मुलींसोबत प्रताप महाविद्यालयात गेली होती दुपारी १ वाजता दिनेश रमेश सोनवणे रा कुऱ्हाळदा ता जळगाव याने तिला फूस लावून पळवून नेले मुलीच्या वडिलांनी अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून भादवी ३६३, ३६६ अ प्रमाणे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल किशोर पाटील करीत आहेत.